मुंबई, 23 सप्टेंबर : अनेकदा नदी किंवा समुद्राची सफर करताना आपण स्पीड बोट पाहातो. पण हीच स्पीड बोट अचानक समुद्र-नदी सोडून रस्त्यावर धावली तर पाहून हैराण व्हायला होईल असाच एक अजब व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही स्पीड बोट पाण्याएवढीच सुसाट हायवेवरही धावताना दिसली आणि रस्त्यावरील प्रवाशांच्या भुवया एकदम उंचावल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एक स्पीड बोट सुसाट वेळानं जात आहे. याचं डिझाइन बोटीसारखं आणि खाली चाक असलेली ही बोटवजा कार वेगानं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना नक्की ही बोट आणि की कार हा प्रश्न पडला. या गाडीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Hang on 😭😭 pic.twitter.com/6dmP5i8Zgo
— Theo Shantonas (@TheoShantonas) September 21, 2020
We have a car boat here in Spokane, WA. Been driving around for more than a decade lol.
— A nobody (@CyFrieza) September 21, 2020
हे वाचा-OMG! एकही फांदी न तोडता आंब्याच्या झाडावरच बांधलं चार मजली आलिशान घर; पाहा PHOTO
आतापर्यंत हा व्हिडीओ 11 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. @TheoShantonas नावाच्या युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. बोटच्या आकारात ही खास कार तयार करण्यात आली आहे. ही कार पहिल्यांदा पाहताना स्पीड बोट वाटते मात्र नंतर ही खास कार तयार करून घेतल्याचं लक्षात येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हा फ्लोरिडामधील असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.
हा व्हिडीओ पाहून अनेक युझर्स संभ्रमात पडले. पाण्यावर चालणारी स्पीड बोट रस्त्यावर कशी पळते असंही म्हटलं आहे तर काहींना ही संकल्पना खूप आवडल्याचंही दिसत आहे. सोशल मीडियावर ही संकल्पना खूप आवडली असून हा व्हिडीओ युझर्सनी खूप शेअर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.