सोशल मीडियावर नियमित विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ भावनिक असतात. जे पाहून डोळ्यात अश्रू उभे राहतात, तर काही इतके मजेशीर असतात की हसून हसून डोळ्यात पाणी येऊ लागतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र कोणताही बाबा असं गिफ्ट मिळण्याची आशा करणार नाही. (Social Media Viral Video)
आज ‘फादर्स डे’ आहे. आयुष्यात वडिलांचं अस्तित्व सेलिब्रेट करण्याचा दिवस आहे. अशात सोशल मीडियावर वडिलांसाठी स्पेशल व्हिडीओ, पोस्ट आणि मेसेज शेअर केले जात आहेत. वडिलांसाठी अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली आहे. जी पाहून वडील पुढे काहीच बोलणार नाही. कोणत्याही वडिलांना असं गिफ्ट नकोच.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. हा एक टिकटॉक व्हिडीओ क्लिप आहे. ज्यात एका व्यक्तीला त्याची पत्नी विशेष करुन फादर्स डेवर निमित्त गिफ्ट म्हणून झाडू देते. सर्व साधारणपणे फादर्स डेवर मुलं आपल्या वडिलांना गिफ्ट देतात. मात्र येथे एका पत्नीने फादर्स डे निमित्ताने आपल्या पतीला गिफ्ट दिलं आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, पत्नी पहिले आपल्या पतीचं औक्षण करते आणि त्यानंतर त्याला गिफ्टमध्ये झाडू देते. पतीदेखील एखाद्या तलवारीप्रमाणे झाडू कपाळाला लावतो आणि काम सुरू करतो.
Father's day gift😁 From WIFE pic.twitter.com/Ek90qoh2eE
— Rupin Sharma IPS (@rupin1992) June 20, 2021
हे ही वाचा-बापाचं प्रेम पाहून येईल डोळ्यात पाणी;भर पावसात मुलीच्या अभ्यासाठी छत्री घेऊन उभा
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोक हा मजेशीर व्हिडीओ शेअर करीत आहेत आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत. पतीला गिफ्ट देण्याची नवीन आयडिला मिळाल्याचंही काहींनी व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.