मराठी बातम्या /बातम्या /Viral /

जिगरी दोस्त! कुत्र्यानं चिमुकल्याला रांगायला शिकवलं; ही अनोखी मैत्री जिंकेल तुमचं मन, VIDEO

जिगरी दोस्त! कुत्र्यानं चिमुकल्याला रांगायला शिकवलं; ही अनोखी मैत्री जिंकेल तुमचं मन, VIDEO

व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुत्रा लहान मुलाला रांगायला शिकवताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुत्रा लहान मुलाला रांगायला शिकवताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुत्रा लहान मुलाला रांगायला शिकवताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : प्राणी आणि माणूस यांच्यातील मैत्री अतिशय खास (Human-Animal Bond) असते. मात्र यातही कुत्रा हा माणसाचा सर्वात खास मित्र मानला जातो. आता पुन्हा एकदा एका कुत्र्यानं ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे की तो माणसाचा सर्वात आवडता प्राणी का असतो. याचाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात माणूस आणि कुत्रा यांच्यातील अनोखं नातं पाहायला मिळतं.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुत्रा लहान मुलाला रांगायला शिकवताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एका लहान बाळाचं आणि कुत्र्याचं अनोखं नातं पाहायला मिळतं. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला (Viral Video of Little Baby and Dog) नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका लहान मुलासमोर एक प्रेमळ कुत्रा बसलेला आहे. क्लिप पाहून असं वाटतं की या चिमुकल्या बाळाला चालायला येत नाही आणि कुत्रा त्याला चालायला शिकवण्याचा प्रयत्न करतो. मात्र बाळ अतिशय लहान असल्याने ते चालू शकत नाही. यानंतर काही वेळातच कुत्रा या बाळाच्या जवळ येतो आणि पुन्हा त्याला रांगायला शिकवू लागतो.

व्हायरल होणारा हा व्हिडिओ ट्विटरवर आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. याला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, शिकवणी हे मनापासून केलं जाणारं काम आहे. बाळाला रांगायला शिकवणारा हा कुत्रा किती सुंदर आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 91 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. याशिवाय अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.

सोशल मीडियावर या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं की हे दृश्य खरंच खूप सुंदर आणि प्रेमळ आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं की या वर्षभरात पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडिओ. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

First published:

Tags: Dog, Video Viral On Social Media