वाटेतील एकही झाड न जाळता याठिकाणी पसरली विचित्र आग, VIDEO पाहून नेटकरी हैराण

वाटेतील एकही झाड न जाळता याठिकाणी पसरली विचित्र आग, VIDEO पाहून नेटकरी हैराण

सध्या सोशल मीडियावर आगीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 'Controlled Fire' असं नेटकऱ्यांनी या आगीला म्हटलं आहे

  • Share this:

स्पेन,13 मे : या वर्षाच्या सुरूवातील ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे वन्यप्राण्यांचे आणि वन्य संपत्तीचे मोठे नुकसान झाले होते. ऑस्ट्रेलियातील जंगलामध्ये हाहाकार माजला होता. दरम्यान सध्या सोशल मीडियावर आगीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 'Controlled Fire' असं नेटकऱ्यांनी या आगीला म्हटलं आहे. हा व्हिडीओ स्पेनमधील असल्याचं सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सांगण्यात येत आहे. एका पार्कामध्ये केवळ गवताच्या वरच्या थराला आग लावण्यात आली आहे. पण त्यामुळे ना त्याठिकाणची झाडं जळत आहेत ना बेंच! त्यामुळे सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ फेसबुकवर Club De Montaña Calahorra या पेजने पोस्ट केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर या व्हिडीओबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काहींना ही कल्पना खूप भन्नाट वाटत आहे तर काहींनी हे खोटं असल्याचा दावा केला आहे. आगीची ही पद्धत वेगळी असल्याचं मतही अनेकांनी व्यक्त केलं आहे.

First published: May 13, 2020, 8:06 AM IST
Tags:

ताज्या बातम्या