Home /News /viral /

साखर झोपेत असताना 33 मजली इमारतीत अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा LIVE VIDEO

साखर झोपेत असताना 33 मजली इमारतीत अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा LIVE VIDEO

या आगीत तब्बल 88 लोकं गंभीर जखमी झाले आहे. अजूनही आगीतून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

  सियोल, 09 ऑक्टोबर : दक्षिण कोरियाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओ दक्षिण कोरियातील उलसन शहराचा आहे. या शहरात सकाळी एका 33 मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत तब्बल 88 लोकं गंभीर जखमी झाले आहे. अजूनही आगीतून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दक्षिण कोरियाच्या गृह आणि सुरक्षा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ही आग प्रचंड भीषण होती. या आगीत किमान जखमी झालेल्या 88 लोकांवर उपचार सुरू आहेत. या आगीचा भीषण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा-हायवेवर झोपून काढत होते Naked Selfie, मागून आली पोलिसांची गाडी आणि... वाचा-धक्कादायक VIDEO! साखळी चोरांनी चेन ऐवजी पकडला महिलेचा गळा; बाईकवरून खेचलं आणि...
  या आगीचे व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोकं चिंतीत आहे आणि लोकांची काळजी घ्या असे आव्हान केले जात आहे. मुख्य म्हणजे ही आग इतकी भीषण होती की उशीरा पर्यंत आग विझवण्याचे काम सुरूच होते. वाचा-2500 वर्षांपासून कॉफिनमध्ये बंद होता मृतहेद, शास्त्रज्ञांनी लोकांसमोरच उघडला अखेर आग आटोक्यात आणण्यासाठी हेलिकॉप्टरनं पाण्याचा वर्षाव करावा लागला. याचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान दक्षिण कोरिया सरकारनं जमखींचे उपचार मोफत करण्यात येत असल्याचे सांगितले.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Video viral

  पुढील बातम्या