Home /News /viral /

Video : फुटबॉल खेळणाऱ्या मुलाने बापाच्या तोंडावर मारली अशी किक; डोक्यातच गेली सणक

Video : फुटबॉल खेळणाऱ्या मुलाने बापाच्या तोंडावर मारली अशी किक; डोक्यातच गेली सणक

सोशल मीडियावर (Video Viral On Social Media) सध्या एक अत्यंत मजेशीर व्हिडीओ (Funny Video) व्हायरल होत आहे.

  Comedy Video: सोशल मीडियावर (Video Viral On Social Media) सध्या एक अत्यंत मजेशीर व्हिडीओ (Funny Video) व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एक मुलगा आणि त्याच्या वडिलांशी संबंधित आहे. व्हिडीओमध्ये मुलगा आपल्या वडिलांसोबत असं काही करतो, जे पाहायला खूप मजेशीर वाटत असलं तर याचे परिणाम मुलाला भोगावे लागले असतील. अर्थात मुलाचं हे कृत्य चुकीचच आहे. मात्र यातून जो व्हिडीओ समोर आला आहे तो पाहताना तुम्ही पोट धरून हसाल. वडिलांना फुटबॉलने किक मारलं... व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक मुलगा आपल्या वडिलांना फुटबॉलने नेम धरून किक मारतो. खोडकर मुलाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. तर काहींनी हा व्हिडीओ फनी असल्याचं सांगितलं. तुम्ही पाहू शकता की, मुलगा फुटबॉल खेळत आहे. यादरम्यान मुलाचे वडील बसून काही तरी काम करीत आहेत. तेव्हा मुलगा असं काही करतो, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे ही वाचा-यांचाही सुरू आहे Summer Holiday! चक्क दिवसाढवळ्या झाडावर झोप काढताहेत सिंहिणी; VIDEO VIRAL व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वडील खाली बसून काहीतरी काम करीत आहे. तो फुटबॉल ठेवून वडिलांच्या दिशेने निशाणा धरला. आणि पाहता पाहता तो फुटबॉल वडिलांच्या तोंडावरच मारतो. काही क्षणासाठी वडीलही हबकतात आणि उठून मुलाच्या मागे धावतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर its_awesome_7 नावाच्या अकाऊंटवर अपलोड केलं आहे. व्हिडीओ लोकांना इतका फनी वाटत आहे की, आतापर्यंत 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Funny video, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या