Home /News /viral /

'...आणि त्यांना पुन्हा प्रेम मिळालं', वडिलांच्या पुनर्विवाहाचे मुलानं शेअर केले PHOTO

'...आणि त्यांना पुन्हा प्रेम मिळालं', वडिलांच्या पुनर्विवाहाचे मुलानं शेअर केले PHOTO

शायॉन पाल नावाच्या ट्विटर युझरने आपल्या वडिलांचे नुकतेच लग्न झाल्याची माहिती सर्वांना दिली आणि आपल्या कुटुंबाचे फोटो शेअर केले.

    मुंबई, 05 डिसेंबर : जेव्हा दोन लोक एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा ही नेहमीच आनंदाची गोष्ट असते. परंतु आपण अपारंपरिक विवाह करत असताना आपल्या प्रियजनांची स्वीकृती मिळणे म्हणजे अगदीच चेरी ऑन द केक आहे. शायॉन पाल नावाच्या ट्विटर युझरने आपल्या वडिलांचे नुकतेच लग्न झाल्याची माहिती सर्वांना दिली आणि आपल्या कुटुंबाचे फोटो शेअर केले. शायॉनने पुढे सांगितले की या सोहळ्याला जवळचे मित्र व कुटूंबियांनीच हजेरी लावली होती. कोव्हिड-19 ची परिस्थिती लक्षात ठेवून, शायॉनने दिलेल्या माहितीनुसार, लोक बहुतेक वेळ सोहळ्यामध्ये मास्क घालून होते. “ते दोघं आनंदात आणि मजेत होते. माझ्या आईच्या मृत्यूच्या नंतर 10 वर्षे माझे वडील एकटे राहिले, मला आनंद झाला की त्यांना पुन्हा प्रेम मिळालं!”, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. फोटोच्या मध्यभाग पुष्पहार घालून वधू आणि वर त्यांच्या कुटुंबीयांसह उभे आहेत. ट्विटर यूझर रितुपर्णा चॅटर्जी यांनी यावर कमेंट केले की, “तू एक चांगला माणूस आहेस शायॉन. तुझ्यासारखे आणखी लोक असायला हवेत.” तिच्या कमेंटला उत्तर म्हणून इतर बर्‍याच युझर्सनी सहमती दर्शवली, व एका यूझरने ‘नक्कीच’ कमेंट करून तिच्याशी सहमत असल्याचे दाखवले. दुसर्‍या व्यक्तीने शायॉनच्या वडिलांचे अभिनंदन केले. हे शायॉनच्या वडिलांचे दुसरे लग्न असल्याचे म्हणत, त्या व्यक्तीने म्हटले की ‘ माझं इथं पहिलं लग्न ठरत नाहीए, असू दे अभिनंदन’ या कमेंटला, शायॉनने स्पोर्टिंगली उत्तर दिले की ‘तू माझ्या वडिलांचा नंबर घ्यावास आणि त्यांच्याकडून काही डेटिंग टिप्स घ्याव्यात.’ आपली कृतज्ञता दर्शविण्यासाठी आणि आधीच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाल्याने आश्चर्यचकित झालेल्या शायॉनने या जोडप्याचे आणखी फोटो शेअर केले. फुलांच्या बॅकड्रॉपसोबत, नव-विवाहित जोडपं प्रेमात हसत होते आणि एकमेकाकडे पाहत होते. हे चित्र पाहून एका यूझरने शायॉनचे अभिनंदन केले आणि ट्विट केलं, ‘ही आजच्या दिवसातली इंटरनेटवरील सर्वांत सुंदर पोस्ट आहे.’ हे वाचा-WOW! या सेल्फी केकला पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास, पाहा VIDEO बायकोसह शायॉनच्या वडिलांचे फोटो पाहून बरेच लोक आनंदी झाले. एका यूझरने म्हटले, “वाह हे दोघे अगदी प्रेमळ आणि मोहक दिसत आहेत.” पुन्हा प्रेम शोधण्याची ही अनोखी कहाणी एखाद्याच्या हृदयाची तार नक्कीच छेडेल. शायॉनच्या या ट्विटला बरीच वाहवा मिळाली आणि अनेक लोकांनी त्याच्या कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या