मराठी बातम्या /बातम्या /Viral /मम्मी रॉक मुलगा शॉक! साध्याभोळ्या आईचं टॅलेंट पाहून लेकाची हवा टाईट; VIDEO VIRAL

मम्मी रॉक मुलगा शॉक! साध्याभोळ्या आईचं टॅलेंट पाहून लेकाची हवा टाईट; VIDEO VIRAL

आईचं करतब पाहून मुलगाही हैराण झाला.

आईचं करतब पाहून मुलगाही हैराण झाला.

आईचं करतब पाहून मुलगाही हैराण झाला.

मुंबई, 28 सप्टेंबर : आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर सावलासारखी साथ देणारी आई (Mother). बाळाचा (Baby) हात धरून त्याला चालायला शिकवते. शिवाय त्यांच्यावर संकटं आल्यास ती ढाल बनून त्यांच्यासमोर उभी राहते (Mother and child). पण मुलांना मात्र आपल्या आईच्या ताकदीचा अंदाज नसतो (Mother saved life of children). त्यामुळे आपल्या साध्याभोळ्या आईला काही येणार नाही असं त्यांना वाटतं. अशाच एका मुलाने आपल्या आईला एक चॅलेंज दिलं (Son gave bottle challenge to mother). पण आईचं टॅलेंट (Son shocked by mother's talent) पाहून त्याची हवाच टाईट झाली.

मुलांसाठी केलेलं कोणतंही काम आईसाठी अशक्य नसतं, हे या आईने दाखवून दिलं. आईचं करतब पाहून मुलगाही हैराण झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. आईशी पंगा घ्यायचा नाही अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक महिला किचनमध्ये काम करते आहे. इतक्यात तिचा मुलगा तिथं येतो. तो आपल्या आईला एक चॅलेंज देतो. बॉटल चॅलेंज असते ते. बॉटल हवेत उडवत म्हणजे फ्लिमप करत ती सरळ ठेवायची असं हे बॉटल चॅलेंज.

हे वाचा - VIDEO - लग्नात आजीने दाखवला आपला जलवा; नवरा-नवरी, दिर-वहिनीचा डान्सही विसराल

मुलाला वाटलं आपली आई हे चॅलेंज पूर्ण करणार नाही. म्हणून त्याने तिने हे चॅलेंज पूर्ण केलं तर तिला दोन हजार रुपये देणार असं सांगितलं. आई बिनधास्त येते. हातात ती बाटली घेते आणि जशी काय ती बॉटल चॅलेंजमध्ये तरबेज आहे, असं अगदी पहिल्याच फटक्यात ती चॅलेंज पूर्ण करते. तिचं हे टॅलेंट पाहून मुलगाही थक्क होतो. ठरलेल्या अटीनुसार आई त्याच्याकडून दोन हजार रुपये मागते आणि मुलगा तिच्या हातात दोन हजारची नोट ठेवते. आई तीच नोट त्याला दाखवत त्याची मजा घेते.

हे वाचा - TikTok चॅलेंज पूर्ण करण्यासाठी चिमुकलीनं गिळले तब्बल 23 चुंबक; झाली भयंकर अवस्था

व्हिडीओ नेशन फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Mother, Parents and child, Son, Viral, Viral videos