मराठी बातम्या /बातम्या /Viral /मुलाने स्क्रीनवर तवा आदळून फोडला महागडा TV; पालकांनी जे केलं ते पाहून संतापले नेटकरी, VIDEO

मुलाने स्क्रीनवर तवा आदळून फोडला महागडा TV; पालकांनी जे केलं ते पाहून संतापले नेटकरी, VIDEO

स्क्रीनवर तवा आदळून फोडला महागडा TV

स्क्रीनवर तवा आदळून फोडला महागडा TV

व्हिडिओमध्ये एक लहान मूल हातात लोखंडी तवा घेऊन टीव्ही स्क्रीनवर मारताना दिसत आहे. त्यामुळे टीव्हीचा काही भाग तुटतो आणि स्क्रीन खराब होते.

नवी दिल्ली 26 मे : लहान मुलं सहसा खूप खोडकर असतात, जी दिवसभर मस्तू करून घरातील लोकांना त्रास देताना दिसतात. अनेक वेळा त्यांचा खोडकरपणा एवढा वाढतो की त्यांना सुधारण्यासाठी पालक त्यांना फटकारताना तसंच त्यांच्या चुकीची शिक्षाही देताना दिसतात. पूर्वी घरात खोडसाळपणा करणाऱ्या मुलांना आई-वडील मारहाण करताना दिसत होते. मात्र आता अनेक पालक आपल्या मुलांच्या मोठ्या चुकाही सहज माफ करताना दिसतात.

नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक मूल त्याच्या खोडकरपणामुळे त्याच्या पालकांचं हजारोंचं नुकसान करताना दिसत आहे. यादरम्यान, त्याला फटकारण्याऐवजी किंवा त्याची चूक सुधारण्याऐवजी, त्याचे पालक त्याला अधिक नुकसान करण्यासाठी प्रवृत्त करताना आणि हे सगळं कॅमेऱ्यात कैद करताना दिसतात. जे पाहून युजर्स चांगलेच संतापले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Baby Reels (@baby_reels)

सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ यूजर्स शेअर करत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर baby_reels नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मूल हातात लोखंडी तवा घेऊन टीव्ही स्क्रीनवर मारताना दिसत आहे. त्यामुळे टीव्हीचा काही भाग तुटतो आणि स्क्रीन खराब होते. हे पाहून हजारो रुपये किमतीचा टीव्ही खराब झाल्याचा अंदाज बांधता येतो.

असं कृत्य केल्यास सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना याची मोठी शिक्षा पालक देऊ शकतात. मात्र या मुलाचे पालक त्याचा व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. अशा स्थितीत युजर्सच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, 'मी तिथे असतो तर कानशिलात मारली असती.' दुसर्‍याने कमेंट करत लिहिलं, 'अरे भाऊ, इतके पैसे, मुल टीव्ही तोडत आहे आणि तुम्ही लोक व्हिडिओ बनवत आहात. व्वा, श्रीमंत लोकांची कहाणी'. दुसर्‍या वापरकर्त्याने हा प्रसिद्ध आणि व्हायरल होण्याचा एक मार्ग असल्याचं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking video viral, Videos viral