Home /News /viral /

VIDEO - जेवणात तेल कमी घालायला सांगितलं म्हणून भडकली आई; रागात लेकाला...

VIDEO - जेवणात तेल कमी घालायला सांगितलं म्हणून भडकली आई; रागात लेकाला...

आई आणि लेकात जेवणातील तेलावरून जुंपली. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे हा व्हिडीओ.

  मुंबई, 05 ऑगस्ट :  बहुतेक पदार्थ बनवताना त्यात महत्त्वाचा घटक असतो ते म्हणजे तेल. वाढत्या महागाईत तेलाच्या किमतीही वाढल्या. आता कुठे तेलाच्या किमती कमी होऊ लागल्या आहेत. तरी डाएट करणारे, फिटनेस फ्री, आरोग्याची अधिक काळजी घेणारे लोक तसं तेलाचं कमीच सेवन करतात. कमीत कमी तेलातील पदार्थ खातात. असंच कमी तेलाचं सेवन करणाऱ्या एका मुलाने आईला जेवणात कमी तेल खाण्याचा सल्ला दिला. ज्यामुळे भडकलेल्या आईने रागात लेकाला चांगलाच धडा शिकवला. आई आणि लेकाचा तेलावरून झालेल्या भांडणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. मुलगा आपल्या आईला कमी तेलात जेवण बनवायला सांगतो. त्यानंतर आई संतप्त होते आणि पुढे काय घडतं ते तुम्हीच पाहा. व्हिडीओत पाहू शकता आई किचनमध्ये बेसनाचा पोळा बनवते आहे. त्याचवेळी मुलगा तिथं येतो. तो आईला तेल न टाकण्याचा सल्ला देतो. यावर आई भडकते. "बेसनचा पोळा पाण्यात बनवू का, कसा बनणार तो, थोडं तेल तर टाकावंच लागणार ना", असं ती रागात सांगते. हे वाचा - VIDEO - अवघ्या 7 वर्षांचा चिमुकला बनला Delivey Boy; कारण ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर लेक म्हणजे संपूर्ण डाएटचा सत्यानाश, असं म्हणतो. लेकाचं हे वाक्य ऐकून आई आणखी भडकते. "तू स्वतःच बनव. स्वतः बनवतो तेव्हा जगभरातील मसाले टाकतो. तेव्हा तुला समजत नाही का?", असं ती म्हणते.
  View this post on Instagram

  A post shared by Be Harami (BH) (@be_harami)

  आई इतक्यावर थांबत नाही. ती पुढे म्हणते, "जेव्हा तू करतो तेव्हा काही होत नाही आणि मी करते तेव्हा चांगलं देशी तूप, घरातील चांगला नाश्ता तुला चांगला वाटत नाही. बाहेर बर्गर खातो तेव्हा तुझं फॅट वाढत नाही" हे वाचा - जपानी यूट्यूबरचं 'वडापाव प्रेम'; मुंबईच्या रस्त्यावरील आजोबांसाठी केलं कौतुकास्पद काम, मन जिंकणारा VIDEO त्यावर मुलगा देशी तुपातही खूप फॅट असल्याचं सांगतो. त्यानंतर आईच्या रागाचा पारा इतका चढतो ती लेकाला मारण्याचीच धमकी देते. "चमचाच खा. बेसन पोळा मिळणार नाही, चमचा मिळेल. जे मिळतं आहे ते गप्पपणे खा", असं बोलून ती लेकाची बोलतीच बंद करते.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Mother, Parents and child, Viral, Viral videos

  पुढील बातम्या