मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कागद आणि कात्री हातात येताच आर्टिस्टने बनवलं असं काही.., पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय VIDEO

कागद आणि कात्री हातात येताच आर्टिस्टने बनवलं असं काही.., पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय VIDEO

फोटो

फोटो

नानाविध कला सादर करणाऱ्यांचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांना नेटिझन्सकडून भरमसाठ प्रतिसादही मिळतो. कलाकार तर खूप आहेत, पण काहींच्या हातांमध्ये जणू जादूच असते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 28 सप्टेंबर-   नानाविध कला सादर करणाऱ्यांचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांना नेटिझन्सकडून भरमसाठ प्रतिसादही मिळतो. कलाकार तर खूप आहेत, पण काहींच्या हातांमध्ये जणू जादूच असते. अशा कलाकारांची कला पाहायला मिळाली तर ती एक पर्वणीच म्हणावी म्हणावी लागेल. इंटरनेटवर सध्या असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात एका कलाकाराने कागदाचा तुकडा घेत कात्रीच्या आधारे फुटबॉल खेळाडूचा चेहरा तयार केला आहे. कलाकृती इतकी सफाईदारपणे तयार केली की, व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास होणार नाही.

इन्स्टाग्रामवर eduwoes नावाच्या अकाउंटवरून व्हिडिओ शेअर केला गेलाय. यात एका कलाकारानं लॅपटॉपवर महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोनाचा फोटो स्क्रिनवर काढून ठेवला आणि हातात कात्री पकडून कागदाच्या तुकड्याला कापत अत्यंत हुबेहुब मॅराडोनाचा चेहरा त्या कलाकृतीतून साकारला. ही कला पाहून लोक या आर्टवर्कचं मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.

कागदाच्या तुकड्याला दिला आकार

व्हायरल व्हिडिओमध्ये कलाकाराने लॅपटॉपवर महान फुटबॉलपटू दिएगा मॅराडोनाचा फोटो समोर काढून ठेवला. त्यानंतर कात्री घेऊन कागदाच्या तुकड्याला विशिष्ट पद्धतीनं व सफाईदारपणे कापलं. ही कलाकृती तयार होईपर्यंत इतकी हुबेहुब कलाकृती कशी बनू शकते असं वाटायला लागतं. कौतुक म्हणजे अत्यंत अल्प वेळेत व लॅपटॉपवरील त्या फोटोला बारकाईने न पाहता या कलाकारानं हे आर्टवर्क बनवलंय. एखादा जादूगर ज्या पद्धतीनं जादू करतो त्याप्रमाणे ही कला त्या कलाकाराने सादर केली आहे.

कलाकृतीसाठी फक्त कागद अन् कात्री हेच साहित्य

एखादी उत्कृष्ट कलाकृती सादर करायची असल्यास खूप सारं साहित्य आवश्यक असतं. पण महान फुटबॉलरची कलाकृती सादर करण्यासाठी या कलाकाराने फक्त कागद आणि कात्री या दोनच वस्तू वापरल्या. कात्रीनं कागद कापताना त्या कलाकारानं अत्यंत वेगानं वेगवेगळ्या ठिकाणी बारीक कट केले. कटिंग पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्या कलाकारानं तो कागद पूर्ण उघडला तेव्हा त्यातून उत्कृष्ट अशी कलाकृती समोर आली. लॅपटॉपच्या स्क्रिनवरील फोटो आणि कागद कापून तयार केलेली कलाकृती यात काहीच फरक जाणवत नाही असं या व्हिडिओत दिसतंय. खेळाडूचं नाक, ओठ, कान व हावभाव अत्यंत हुबेहुब त्या कलाकृतीत उतरले आहेत. ही कलाकृती पाहून कुठलीही व्यक्ती कलाकाराच्या कौशल्याचं कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही.

(हे वाचा:मुलीसाठी आईचा Desi Jugaad, सायकलवर बनवली 'कारवाली सीट', Video पाहून विश्वास बसणार नाही )

व्हिडिओला 26 हजारहून अधिक लाईक

कागद आणि कात्रीच्या आधारे खेळाडूचा चेहरा साकारण्याची ही कलाकृती सोशल मीडियावर नावाजली जात आहे. कलाकाराच्या आर्ट वर्कला सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळत आहे. अनेक युजर्स स्वत:चं आर्ट वर्क तयार करून देण्यासाठी या कलाकाराकला विनंती करत आहेत. ही कलाकृती अभूतपूर्व आणि अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. या व्हिडिओला 26 हजार पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

First published:

Tags: Viral, Viral news