ऑर्डर घेऊन जाणाऱ्या Delivery Boy कडून गुडांनी हिरावून घेतलं पार्सल; SWIGGY ने तरुणीला मेसेज करुन सांगितलं...

ऑर्डर घेऊन जाणाऱ्या Delivery Boy कडून गुडांनी हिरावून घेतलं पार्सल; SWIGGY ने तरुणीला मेसेज करुन सांगितलं...

तरुणीने एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला असून हा मजेशीर मेसेज वाचून तुम्ही पोट धरून हसाल

  • Share this:

नोएडा, 26 जानेवारी : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे वाचून तुम्ही हैराण व्हाल. येथे काही अज्ञात गुडांनी Swiggy च्या डिलिव्हरी बॉयकडून फूड ऑर्डर खेचून घेतली आणि पळ काढला. या घटनेबाबत चयनिका दास नावाच्या एका तरुणीने आपल्या ट्विटवर वरुन पोस्ट केली आहे. तरुणीने नोएडामधून आपली पहिली ऑर्डर बुक केली होती, मात्र या घटनेनंतर तिला आपली ऑर्डर रद्द करावी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार तरुणीने आपली ऑर्डर रद्द केल्याबद्दल मिळालेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिली आहे की, मला या गोष्टीचा खेद आहे की, आम्ही तुमची ऑर्डर पोहोचवू शकलो नाही. कारण आमची ऑर्डर काही अज्ञात गुंडानी हिरावून घेतली.

हे ही वाचा-

मला मान्य आहे ही बाब अत्यंत निराशाजनक आहे. मी तुमच्यासाठी ही ऑर्डर रद्द करतो. तुम्हाला विनंती आहे की, दुसऱ्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर करा. या मेसेजला उत्तर देताना तरुणीने लिहिलं की, हिरावून घेतलं, नोएडामध्ये हे असं होतं का?

तरुणीने ट्विटवर शेअर केलेला हा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यानंतर तरुणीने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, तिला फूड डिलिव्हरी अपच्या कस्टमर केअरमधून एक फोन आला, आणि ते म्हणाले की, मॅडम तुमचं पार्सल घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून ऑर्डर हिरावून घेण्यात आलं आणि त्याला खूप मारहाण केली.

Published by: Meenal Gangurde
First published: January 26, 2021, 5:10 PM IST
Tags: swiggy

ताज्या बातम्या