मुंबई, 8 मार्च : महिलादिनी एका पत्नीचं रौद्ररुप दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या पतीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. तसंच या मारहाणीदरम्यान ती महिला आपल्या पतीवर संतापही व्यक्त करताना दिसत आहे.
दुसऱ्या तरुणीला I Love You म्हटल्याने बायकोने नवऱ्याला बेदम मारहाण केली, अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये महिला अत्यंत निष्ठूरपणे आपल्या पतीला मारत आहे. मार खाणारा तो पती तिच्याकडे क्षमा-याचना करत आहे. मात्र संतापलेली महिला थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही.
महिला आपल्या पतीला मारहाण करत असताना घरात असणारे इतर लोक तिला पाठिंबा दर्शवत अधिक मारहाण करण्यास फूस लावत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये होणारे संवाद मराठीमध्ये असल्याने हा प्रकार महाराष्ट्रातच घडल्याची शक्यता आहे.
दुसऱ्या तरुणीला I Love You म्हणाला म्हणून पत्नीने दाखवलं रौद्ररूप pic.twitter.com/ps23lYKPnl
— Akshay Shitole (@AkshayShitole21) March 8, 2020
मात्र हा व्हायरल व्हिडिओ नेमका कुठल्या भागातील आहे आणि या व्हिडिओबाबत केला जाणारा दावा कितपत खरा आहे, याबाबतची ठोस माहिती मिळू शकलेली नाही. 'न्यूज18 लोकमत' या व्हिडिओची आणि त्याबाबत करण्यात येत असणाऱ्या दाव्याची पुष्टी करत नाही.