1999 पासून बंद असलेल्या हॉस्पिटलमध्ये फिरताना दिसली एक भीतीदायक आकृती, VIDEO VIRAL

1999 पासून बंद असलेल्या हॉस्पिटलमध्ये फिरताना दिसली एक भीतीदायक आकृती, VIDEO VIRAL

युके (United Kingdom) मधील 1999 पासून बंद असलेल्या मेंटल हाॅस्पिटलचा (Mental Hospital) एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे.

  • Share this:

लंडन, 13 मार्च : युके (United Kingdom) मधील 1999 पासून बंद असलेल्या मेंटल हाॅस्पिटलचा (Mental Hospital) एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. या ओसाड आणि निर्मनुष्य असलेल्या हाॅस्पिटलमध्ये पांढरे कपडे परिधान केलेली एक मुलगी परिसरात फिरताना व्हिडीओत दिसत आहेत.

युकेमधील वेल्स (Weals) येथील 1999 पासून बंद अवस्थेत असलेल्या मेंटल हाॅस्पिटलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. पॅरानार्मल अॅक्टिव्हिटी (Paranormal Activity) आणि सुनसान जागांना भेटी देत व्हिडीओ निर्मिती करणारी केलीग लव या मुलीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ओसाड पडलेल्या या हाॅस्पिटलच्या खोल्यांमध्ये एका मुलीची सावली फिरताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ तयार करताना मला ही मुलगी दिसली नाही. परंतु, जेव्हा मी व्हिडीओ एडीट करत होते, त्यावेळी मला त्या मुलीची सावली व्हिडीओत दिसल्याचे केलीग हिने सांगितले.

मिरर युकेच्या वृत्तानुसार,  केलीग आणि तिचे सहकारी 1999 सालापासून बंद अवस्थेत असलेल्या या मेंटल हाॅस्पिटलमध्ये व्हिडीओ शूट करण्यासाठी गेले होते. या हाॅस्पिटलची स्थिती कशी आहे, हाॅस्पिटलच्या आतील भागाची अवस्था कशी आहे, हे पाहण्यासाठी ते तेथे गेले होते. केलीग आणि तिचे सहकारी पॅरानाॅर्मलवर संशोधन करतात, तसेच लव टू इन्व्हिस्टीगेट (Love To Invistigate) या नावाने युट्यूब चॅनेल (You tubel) देखील चालवतात. हे हास्पिटल टेलग्राथमधील पावेज भागात आहे. मिड वेल्स सायकॅट्रिक हाॅस्पिटल या नावाने ते पूर्वी ओळखले जायचे. या हाॅस्पिटलची स्थापना 1903 मध्ये करण्यात आली होती, त्यानंतर काही अज्ञात कारणांमुळे ते 1999 मध्ये बंद झाले.

व्हिडीओत दिसली मुलगी

केलीग म्हणाली, की मी आणि माझे मित्र या पुरातन इमारतीची अवस्था कशी आहे यासाठी हाॅस्पिटलमध्ये तपास करायला गेलो होतो. आम्हाला या हाॅस्पिटलमध्ये काही विशेष असे आढळून आले नाही, त्यामुळे आम्ही तेथून परतलो. त्यानंतर आम्ही व्हिडीओचे फूटेज तपासू लागलो तेव्हा हाॅस्पिटलच्या परिसरात अगदी माझ्या समोर एक मुलगी आम्हाला पाहतेय असे दृश्यात दिसले. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक मुलगी दिसते आहे. ती एक खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना दिसतेय. हा व्हिडीओ व्हायरल व्हावा म्हणून केलीगनेच आपल्या मैत्रिणीला अशी वेशभूषा करुन व्हिडीओ बनवल्याचा आरोप होत आहे. परंतु, केलीगने या आरोपांचे खंडन केलं आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 14, 2021, 8:23 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading