टिकटॉक VIDEO बनवण्यासाठी हिसकावलं लोकांच्या हातातील खाणं आणि...

टिकटॉक VIDEO बनवण्यासाठी हिसकावलं लोकांच्या हातातील खाणं आणि...

फुकटचं खाण अनेकांना पसंत असतं. तर या मुलीने सुद्धा फ्री खाण्याचा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सध्या टिकटॉकवर तुफान व्हायरल होतोय.

  • Share this:

कॅलिफोर्निया, 14 फेब्रुवारी : टिकटॉक व्हिडीओ बनवण्यासाठी टिकटॉकर्स कोणत्या थराला जातील ते सांगता येत नाही. जितका जास्त विचित्रपणा या व्हिडीओमध्ये केला जातो, तेवढे जास्त हे व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरतात. असाच विचित्र व्हिडीओ एका मुलीने पोस्ट केला आहे आणि त्याला लाखो युजर्सनी लाईक केलं आहे. फुकटचं खाण अनेकांना पसंत असतं. तर या मुलीने सुद्धा फ्री खाण्याचा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केला आहे. ‘How to get free food at the mall’ म्हणजेच ‘मॉलमध्ये फ्री फूड कसं मिळवायचं’ असं कॅप्शन या मुलीने हा व्हिडीओ शेअर करताना दिलं आहे.

सोशल मीडिया ब्लॉगर कॅट कर्टिसने कॅलिफोर्नियाच्या ग्लेनडेल गॅलेरिया मॉलमध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. ज्यामध्ये तिने सरकत्या जिन्यांवरून जाणाऱ्या लोकांकडून त्यांच्या हातातील खाणं हिसकावून घेतलं आहे. सरकत्या जिन्यावर असल्यामुळे तिला तिथून पळून जाणंही शक्य झालंय.  कॅटने आधी एका मुलाच्या हातातील फ्रेंच फ्राईज हिसकाऊन घेतले. त्या मुलाने कॅटकडे 'खाऊ की गिळू' नजरेने पाहिलं खरं, पण तो काहीच करू शकला नाही. कारण तो काही करायच्या आधीच कॅट सरकत्या जिन्यावरून निघून गेली होती. एवढं करुनही ही टिकटॉकर थांबली नाही. तिने मॉलमध्ये फिरणाऱ्या अनेकांच्या हातातील आईसक्रीम, बर्गर इत्यादी गोष्टी देखील खेचून खाल्ल्या.

@thekatcurtishow to get free food at the mall 😇♬ Rodeo - Lil Nas X & Cardi B

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पण अशाप्रकारे प्रयत्न जर तुम्ही करणार असाल तर जरा सांभाळून.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2020 06:17 PM IST

ताज्या बातम्या