Home /News /viral /

अरे बापरे! लग्नाचा एवढा आनंद की, वरातीत जिवंत कोब्र्यासह पाहुण्यांचा 'नागिन डान्स'; भयंकर Video

अरे बापरे! लग्नाचा एवढा आनंद की, वरातीत जिवंत कोब्र्यासह पाहुण्यांचा 'नागिन डान्स'; भयंकर Video

या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

    ओडिसा, 29 एप्रिल : ओडिशातील (Odisha News) मयूरभंज जिल्ह्यात वरातीत 'मी नागिन..' या गाण्यावर जिवंत कोब्रा सापासह डान्स करणं पाच जणांना भारी पडलं आहे. त्यांना पोलिसांनी अटक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बुधवारी रात्री करंजिया शहरात वराती गारूड्याच्या टोपलीसोबत डान्स करीत आहे. या टोपलीचं झाकणं उघडं आहे, ज्यातून साप दिसत आहे. त्यांनी हा साप भाड्याने घेतला होता. यामुळे घाबरलेल्या स्थानिकांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली. यानंतर वन विभााने घटनास्थळी पोहोचून कोब्र्याची सुटका केली. पोलिसांना एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सापाचा दुरुपयोग करण्यासाठी गारुड्यासह पाच लोकांना अटक करण्यात आली आहे. हे ही वाचा-जामिनावर बाहेर येताच कुख्यात गुन्हेगाराला भररस्त्यावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण, औरंगाबादमधील घटना त्यांनी सांगितलं की, या प्रकरणात चौकशी केली जात आहे आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1982 अंतर्गत कारवाई केली जाईल. साप हेल्पलाइचे संयोजक शुभेंदु मलिकने सांगितलं की, व्हिडीओमध्ये (Shocking Video) पाहू शकता की, साप मोठ्या आवाजाने सुरू असलेलं संगीत आणि गर्दीमुळे घाबरला आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, गारुड्याने कोब्र्याचे विषारी दात काढल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर नवरदेव आणि त्याच्या वडिलांविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Odisha, Shocking viral video

    पुढील बातम्या