मराठी बातम्या /बातम्या /Viral /या देशात साप देतात Back Massage; एकाच वेळी 28 विविध प्रकारच्या सर्पांशी करावा लागतो सामना

या देशात साप देतात Back Massage; एकाच वेळी 28 विविध प्रकारच्या सर्पांशी करावा लागतो सामना

हा बॅक मसाज साधासुधा नाही. वेदना आणि सांधेदुखीवरही आहे फायदेशीर...

हा बॅक मसाज साधासुधा नाही. वेदना आणि सांधेदुखीवरही आहे फायदेशीर...

हा बॅक मसाज साधासुधा नाही. वेदना आणि सांधेदुखीवरही आहे फायदेशीर...

इजिप्त, 2 जानेवारी : थकवा आणि वेदनेपासून मुक्ती मिळविण्यासाठी किंवा मानसिक शांतीसाठी, लोक तेल, क्रीम किंवा विविध औषधी वनस्पतींनी मसाज करतात. मात्र सापांनी बॉडी मसाज केल्याबद्दल आपण कधी ऐकलं आहे का? काहीसा विचित्र आणि भीतीदायक वाटत असला तरी जगातील एका देशात सर्रास सापाकडून बॉडीमसाज केला जातो.

इजिप्शियन स्पा सेंटरमधील लोकांना सापांने मसाज केला जातो. या मसाजमुळे शरीराला खूप आराम मिळतो आणि वेदना कमी होते, असा दावा केला जातो. इजिप्तची राजधानी कायरो येथे एक स्पा सेंटर आहे. येथे लोक विविध प्रकारच्या मसाजपैकी सापांची मसाज देखील निवडू शकतात. येथे सर्प मालिश करताना बिन विषारी साप वापरला जातो.

सर्प मसाजदरम्यान लोकांच्या पाठीवर आणि चेहऱ्यावर जिवंत साप सोडले जातात. या मसाजमुळे लोकांच्या शरीरात होणारी वेदना कमी होते. न्यूज ऐजन्सी रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार सर्प मसाजदरम्यान पहिल्यांदा ग्राहकांच्या पाठीवर तेल लावले जाते आणि त्यानंतर अजगर आणि तब्बल 28 विविध प्रकारचे बिनविषारी साप शरीरावर सोडले जातात. स्पाचे मालक सफवत सेडकी सांगतात की, सर्प मसाजमुळे स्नायू आणि सांधेदुखी कमी करण्यास तसेच शरीरात रक्त प्रवाह व्यवस्थित राखण्यास मदत होते.

स्पामधील एका ग्राहकाने सांगितलं की, सर्प मसाज करीत असताना जेव्हा सापाला त्याच्या पाठीवर ठेवण्यात आलं होतं, तेव्हा त्यांना खूप बरं वाटलं आणि वेदनाही गायब झाल्या. त्यांनी सांगितलं की, पहिल्यांदा तर मी घाबरलो होतो. माझ्या पाठीवर कित्येक साप फिरत होते. मात्र थोड्या वेळाने भीती निघून गेली. याशिवाय चिंता आणि तणावही कमी झाला. हे मसाज सेशन संपल्यानंतर माझा आत्मविश्वासही दुणावला.

First published:
top videos

    Tags: Snake