हे वाचा-…आणि कुत्र्याच्या पट्ट्यावर पाय देताच झाला महिलेचा मृत्यू! पाहा CCTV VIDEO हा व्हिडीओ कुठला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा तीन वर्षापूर्वीचा असल्याची माहिती मिळत आहे. 3 वर्ष जुना जून 2017 रोजीचा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर शेअर झाला आहे. हा साप एसीच्या मागे असलेल्या कॉम्प्रेन्सरमधून घुसला असावा असा काही युझर्सनी अंदाज व्यक्त केला आहे. तर या व्हायरल व्हिडीओनंतर घरातील सर्व कोपरे आणि वस्तू नीट ठेवायला हव्यात त्याची सापसफाई करायला हवी नाहीतर अशा प्रकारे साप आतमध्ये राहू शकतो याबाबत सतर्क राहण्याचीही गरज निर्माण झाली आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही मात्र जून 2017मध्ये हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.Careful, Snake 🐍 caught 🐁 mouse in AC. pic.twitter.com/fiFLhPLLpi
— Jagan Singh IFS (@IfsJagan) August 23, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.