वॉशिंग्टन, 28 जून : या बातमीचा फोटो जर तुम्ही पाहिला तर तो पाहून कुणालाही असंच वाटेल की हा साप (snake) आहे. तुम्हाला असंच वाटलं ना? मग तुम्हीही चुकलात. खरंतर हा साप नाही तर दुसराच प्राणी आहे. सुरुवातीला पाहिल्यानंतर हा सर्वांना सापच वाटेल मात्र शेवटी हा वेगळाच प्राणी असल्याचं समजचं.
सोशल मीडियावर (social media) सध्या हा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे. ज्यामध्ये एक साप दगडावर सरपटताना दिसला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरुवातीला सर्वांना असंच वाटतं. मात्र व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतर पुढे जे दिसतं त्यानंतर आपल्या डोळ्यांवर विश्वाच बसत नाही. व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्काच बसेल. हा साप नाही तर दुसराच प्राणी आहे.
या जीवाला पाच हात आहेत, जे सापासारखे दिसतात. तो दगडावरून हळूहळू पाण्याच्या दिशेने जात होता. ट्विटर युझर लाइडिया रालेंनी हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि हे काय आहे? असं विचारलं आहे.
हे वाचा -
हा व्हिडीओ तसा जुना आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात. प्रत्येकाने वेगवेगळ्या जीवाची नावं घेतली. शेवटी हा जीव नेमका आहे तरी कोण हे समजलंच.
The ophiuroids or ophiuras are a class of the Echinodermata edge. They have pentarradial symmetry and have a starfish-like appearance, with five arms emerging from a central disc. Surely ophiuroids and asteroids are sister groups. there is variety they are beautiful pic.twitter.com/6Oz11QQ5Xq
एका ट्विटर युझरने सांगितलं हा ब्रिटल स्टार आहे. ज्याला ओफियोरोइड असंही म्हणतात. ब्रिटल स्टार समुद्रात राहणारा जीव आहे, जो स्टारफिशसारखा दिसतो. यांना सरपेंट स्टार्स म्हणूनही ओळखतात. याच्या दोन हजारपेक्षा अधिक प्रजाती आहेत. त्यापैकी बहुतेक खोल समुद्रात सापडतात. आपल्या लांब भुजांचा वापर करून ते समुद्रात पोहोतात.