Home /News /viral /

तुम्हीही AC वापरत असाल तर सावधान; अशा ठिकाणी बसला साप ज्याचा कोणी विचारही केला नसेल, VIDEO

तुम्हीही AC वापरत असाल तर सावधान; अशा ठिकाणी बसला साप ज्याचा कोणी विचारही केला नसेल, VIDEO

सध्या समोर आलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही एसीचा वापर करण्याआधी नक्कीच विचार कराल. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये सापाने एसीच्या आतमध्ये आपलं घर बनवल्याचं पाहायला मिळतं (Snake in AC).

  नवी दिल्ली 31 मार्च : सोशल मीडियावर सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos on Social Media) झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ मजेशीर तर काही हैराण करणारे आणि धडकी भरवणारे असतात. यातील अनेक व्हिडिओ असे असतात जे पाहूनच अंगावर काटा येतो. नेटकऱ्यांचीही अशाच व्हिडिओला विशेष पसंती मिळते. त्यातही सापाचे व्हिडिओ (Snake Videos) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. जंगलाच्या राजासमोर छाती ताणून उभा राहिला तरुण; सिंहांसोबत सेल्फी काढायला गेला आणि...; Shocking Video Viral या व्हिडिओमध्ये साप घराच्या आतमध्ये अशा ठिकाणी लपलेला दिसतो, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. उन्हाळा सुरू होताच अनेक घरांमध्ये तापमान कमी करण्यासाठी तसंच उष्णतेपासून वाचण्यासाठी एसीचा वापर केला जातो. मात्र सध्या समोर आलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही एसीचा वापर करण्याआधी नक्कीच विचार कराल. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये सापाने एसीच्या आतमध्ये आपलं घर बनवल्याचं पाहायला मिळतं (Snake in AC).
  साधारणपणे सगळ्यांनाच सापाची प्रचंड भीती वाटते. सापाचं नाव ऐकूनही अनेकांना घाम फुटतो. अशात सापाने आपल्या घरामध्ये राहाण्यास सुरुवात केल्याचं समजल्यावर एखाद्याची काय अवस्था होईल? सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की विषारी साप घरामध्ये लावलेल्या एसीमधून बाहेर येत उंदराची शिकार करत आहे. यात दिसतं की साप आपल्या तोंडामध्ये उंदराला पकडून पुन्हा एसीमध्ये जाऊन बसण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे. OMG! जेवण करताना अचानक प्लेटमधील मासा झाला जिवंत; VIDEO मध्ये पाहा पुढे काय घडलं बातमी देईपर्यंत व्हायरल होणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिला आहे. यासोबतच हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. व्हिडिओ पाहून सहाजिकच कोणाच्याही अंगावर काटा येईल. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत हे दृश्य भीतीदायक असल्याचं म्हटलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Snake video

  पुढील बातम्या