मराठी बातम्या /बातम्या /Viral /नाश्ता तयार करायला गेली महिला आणि टोस्टरमागून निघाला भलामोठा साप

नाश्ता तयार करायला गेली महिला आणि टोस्टरमागून निघाला भलामोठा साप

विशेषतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रेलियातील बदलणारं वातावरण आणि वाढणारा उकाडा यामुळे घरांमध्ये साप आढळून येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

विशेषतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रेलियातील बदलणारं वातावरण आणि वाढणारा उकाडा यामुळे घरांमध्ये साप आढळून येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

विशेषतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रेलियातील बदलणारं वातावरण आणि वाढणारा उकाडा यामुळे घरांमध्ये साप आढळून येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : साप म्हटलं तरी आपल्या अंगावर भीतीनं शहारे येतात अशा परिस्थिती विचार करा तुम्ही सकाळी सकाळी उठून नाश्ता तयार करण्यासाठी स्वयंपाकघरात गेलात आणि समोर साप असेल तर काय होईल. ही कल्पनाच करून काळजात धडकी भरते पण असा प्रकार खरोखरच घडला आहे.

महिला स्वयंपाकघरात नाश्ता करण्यासाठी गेली असताना टोस्टरमागे साप असल्याचं काळजात धस्स झालं. विषारी सापाला पाहून महिलेला घाम फुटला. Red Bellied ज्या सापाला ऑस्ट्रेलियातील सर्वात विषारी साप म्हणून ओळखलं जात तो साप टोस्टरमागे होता. एक क्षण महिलेच्या तोंडातून आवाजच निघेना.

द डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियामध्ये एका घरात महिला ब्रेड टोस्ट करण्यासाठी टोस्टरजवळ गेली असता सर्वात विषारी साप तिला टोस्टरमागे असल्याचं दिसून आलं. महिलेनं तातडीनं कुटुंबियांना याची माहिती दिली आणि सर्पमित्राला फोन लावण्यास सांगितलं.

A lady who was house sitting at Mount Nebo went to place some bread in the toaster only to find a Red Belly Black... Posted by Brisbane North Snake Catchers and Relocation 24hrs 7days 0449922341 on Monday, 23 November 2020 हे वाचा-'धर्म परिवर्तनासाठी दबाव'; वाजिद खान यांच्या पत्नीचे सासरच्यांवर गंभीर आरोप

तिथल्या स्थानिक सर्पमित्र आणि संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या सापाला त्रास दिला किंवा गडबड गोंधळ केला तर हा साप दंश करण्यासाठी अधिक आक्रमक होतो. हा साप आकाराने खूप लहान होता मात्र अत्यंत विषारी असल्यानं तिथे धोकाही होता.

विशेषतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रेलियातील बदलणारं वातावरण आणि वाढणारा उकाडा यामुळे घरांमध्ये साप आढळून येण्याचं प्रमाण वाढलं आहे. साप जमिनीतून बाहेर पडून लोकांच्या घरात गारव्यासाठी शिरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहाणं खूप गरजेचं असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Viral photo