मराठी बातम्या /बातम्या /Viral /सापाला हात लावताचं घडलं असं काही, लोक म्हणाले हे चमत्कारपेक्षा कमी नाही

सापाला हात लावताचं घडलं असं काही, लोक म्हणाले हे चमत्कारपेक्षा कमी नाही

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओ सापाने अशी काही एक्टिंग केली आहे की त्याने भल्याभल्या अभिनेत्यांना देखील मागे टाकलं आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.

मुंबई, 25 मे : सापांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी देखील लोकं घाबरतात. कारण त्याचा एक दंश माणसाचे जागीच प्राण घेऊ शकतात. पण सगळेच साप तितके विषारी नसतात. असे म्हटले जाते की काही सापांचे एक वेळचे विष 20 ते 25 लोकांना झोपू शकते. म्हणूनच ते धोकादायक असते. पण असं असलं तरी देखील काही सर्पप्रेमी सापांना न घाबरता, त्यांची मदत करतात किंवा त्यांना हात लावण्याचं धाडस करतात.

सध्या यासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो एक सर्पप्रेमी आणि सापाशी संबंधी आहे. या व्हिडीओत साप असं काही करतो की पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

विषारी आणि धोकादायक सापांचे आकर्षक रुप कधी पाहिलंय? पाहा जगातील सुंदर सापांचे PHOTO

माणसं की नाटकी असतात. असं आपण नेहमीच म्हणतो. पण नाटकी सापाला तुम्ही पाहिलंय का? या व्हिडीओ सापाने अशी काही एक्टिंग केली आहे की त्याने भल्याभल्या अभिनेत्यांना देखील मागे टाकलं आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ टेक्सासचा आहे, जिथे हा नीळ साप मरण्याचे नाटक करत आहे.

असं सांगितलं जातं की, हे विषारी साप जेव्हा-जेव्हा अडचणीत सापडतात तेव्हा समोरच्या व्यक्तीवर हल्ला करण्याऐवजी स्वतःच्या मृत्यूचे नाटक करायला लागतात. सापाच्या मृत्यूच्या नाटकाचा हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. यूट्यूबच्या एका व्हिडीओमध्ये सापाने असे करताना पाहिल्यावर अनेकांना धक्काच बसला आहे.

जेवण ऑर्डर केल्यावर महिला करायची असा प्रकार, अखेर हॉटेल कर्मचारी पोहोचले कोर्टात

साप किंवा कोणताही प्राणी अशी खरीखुरी एक्टिंग करु शकतात? यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. या सापाचं नाव इंडिगो साप आहे. तो आपल्या आजूबाजूला धोका जाणवताच मरण्याची एक्टिंग करतो. पण जर तुम्ही तो खरंच मेला आहे असा विश्वास ठेवून त्याच्या जवळ गेलात किंवा त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, तर मात्र ते धोकादायक ठरु शकतं.

" isDesktop="true" id="891739" >

हा व्हिडीओ नॅशनल जिओग्राफिक चॅनलचा आहे, जो 2017 मध्ये दाखवण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक विषारी साप मरण्याचे नाटक करताना स्पष्ट दिसत आहे. सापांची अशी वागणूक क्वचितच पाहायला मिळते. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी तर यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Snake, Social media, Top trending, Videos viral, Wild life