मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सलमानपाठोपाठ 'या' अभिनेत्रीलाही सर्पदंश, Shooting करताना घेतला चेहऱ्याचा चावा, पाहा VIDEO

सलमानपाठोपाठ 'या' अभिनेत्रीलाही सर्पदंश, Shooting करताना घेतला चेहऱ्याचा चावा, पाहा VIDEO

ती एक व्हिडिओ शूट करत होती. तिच्या चेहऱ्याजवळ असणाऱ्या सापाने अचानक तिचा चावा घेतला आणि तिला मोठा धक्का बसला.

ती एक व्हिडिओ शूट करत होती. तिच्या चेहऱ्याजवळ असणाऱ्या सापाने अचानक तिचा चावा घेतला आणि तिला मोठा धक्का बसला.

ती एक व्हिडिओ शूट करत होती. तिच्या चेहऱ्याजवळ असणाऱ्या सापाने अचानक तिचा चावा घेतला आणि तिला मोठा धक्का बसला.

  • Published by:  desk news
न्यूयॉर्क, 26 डिसेंबर: अभिनेता सलमान खानला साप चावल्याची घटना ताजी असतानाच आता शूटिंग (shooting) सुरू असताना अचानक सापाने (snake) अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर दंश (bite on face)  केल्याचा व्हिडिओ (video viral) सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. सापाला घेऊन एक गाणं शूट करण्याची तयारी ही अभिनेत्री करत होती. या दरम्यान अचानक सापाने दंश केला आणि अभिनेत्रीला धक्का बसला. विविध प्राण्यांना घेऊन शूटिंग करण्याचा ट्रेंड सध्या सोशल मीडियात आहे. मात्र प्राण्यांसोबत शूटिंग करताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर ही बाब कशा प्रकारे जीवावर बेतू शकते, हे या व्हिडिओतून दिसून येत आहे.  अशी घडली घटना अमेरिकेतील 21 वर्षांची गायिका माएटा एक व्हिडिओ शूट करत होती. व्हिडिओत ब्लॅक लेस बॉडीसूट घातलेली माएटा एका पांढऱ्या बॅकड्रॉपवर झोपल्याचं दिसतं. एक सहकारी तिच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा साप आणून ठेवतो, तर एक काळा साप अगोदरपासूनच तिच्या अंगावर ठेवण्यात आलेला असतो. पांढरा साप अंगावर सोडल्यानंतर काळा साप अचानक आक्रमक होतो आणि अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा चावा घेतो. हे घडताच अभिनेत्री झटक्यानिशी साप अंगावरून बाजूला करते आणि उठते. 
View this post on Instagram

A post shared by Maeta (@maetasworld)

भयंकर अनुभव व्हिडिओ शूट करताना साप आपल्याला चावेल, याची कधी कल्पनाही केली नसल्याचं माएटानं म्हटलं आहे. हा आपल्यासाठी एक भयंकर अनुभव होता आणि या घटनेनंतर आपल्या मनात प्रचंड भीती निर्माण झाल्याचं तिनं म्हटलं आहे. अनेकांना सापाचं नाव काढलं तरी भिती वाटते. दूरवर जरी साप दिसला तरी लोक तिथून पळून जातात. मात्र माएटानं साप अंगावर ठेऊन त्यांच्यासोबत व्हिडिओ शूटिंग  करण्याची मानसिक तयारी केली होती. त्यासाठीच्या शूटिंगलादेखील सुरुवात झाली होती. मात्र शूटिंग सुरू असतानाच सापानं चावा घेतल्यामुळं शूटिंग थांबवण्यात आलं.  हे वाचा - साप होता बिनविषारी हा साप बिनविषारी असल्यामुळे माएटाच्या जिवाला कुठलाही धोका निर्माण झाला नाही. जुजबी उपचारांनंतर तिला घरी सोडण्यात आलं. मात्र शारीरिक इजा झाली नसली, तरी सापाने थेट चेहऱ्याचा चावा घेतल्यामुळे माएटाला जबर मानसिक धक्का बसला.
First published:

Tags: Snake, Video viral

पुढील बातम्या