मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हातात साप घेऊन उपदेश देणं चर्चच्या फादरना पडलं महागात, पाहा श्वास रोखून ठेवायला लावणारा VIDEO

हातात साप घेऊन उपदेश देणं चर्चच्या फादरना पडलं महागात, पाहा श्वास रोखून ठेवायला लावणारा VIDEO

चर्चमध्ये उपदेश देणाऱ्या फादर यांनी सापाला हातात देऊन उपदेश देताना एक भयंकर प्रकार घडला. सापानं त्यांच्यावर हल्ला केला

  • Published by:  Kranti Kanetkar
मिडल्सबोरा, 27 ऑक्टोबर : सापांसोबत मैत्री करणं म्हणजे अवघडच अगदी सर्पमित्रालाही ते दंश करायची संधी सोडत नाहीत. त्यामुळे सापाशी मैत्री म्हणजे विषासोबत खेळणं असं एक समीकरण साधारण असतं. सापांना अगदी जपून हाताळावं लागतं आणि तिथेही एक चूक झाली तर जीवावर बेतू शकतं असाच एक अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. चर्चमध्ये उपदेश देणाऱ्या फादर यांनी सापाला हातात देऊन उपदेश देताना एक भयंकर प्रकार घडला. सापानं त्यांच्यावर हल्ला केला आणि यामध्ये चर्चचे फादर जखमी झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतात एका हातात साप घेऊन फादर चर्चमध्ये जमलेल्यांना उपदेश करत आहेत. हा व्हिडीओ अमेरिकेतील एका चर्चामधील असल्याची माहिती मिळाली आहे. हे वाचा-बाप रे! तोंडातून शिकार सुटली अन् बिबट्यानं गेटवरून मारली उडी, पाहा थरारक VIDEO अमेरिकेच्या मिडल्स्बोरा येथील गॉस्पेल टॅबरनेल चर्च हे एकमेव असं चर्च आहे जिथे साप हाताळण्यासाठी आणि सापांचे संरक्षण करण्यासाठी ओळखले जाते. या चर्चमध्ये टलस्केन नावाच्या सापाला हाताळत असताना त्याने फादरवर हल्ला केला. फादरच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून त्यांना तिथल्या त्यांच्या एका मित्रानं तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. ही घटना घडल्यानंतर उपस्थितांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. सापानं हल्ला केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याला जखमी होते आणि रक्तानं माखलेला शर्ट या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र तरीही फादर या सापाला हातात घेऊन उपदेश देतच असतात. अखेर जखमी झालेल्या अवस्थेत त्यांचा मित्र त्यांना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जातो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
First published:

पुढील बातम्या