मुंबई 24 जानेवारी : इलेक्ट्रिक वस्तुंमध्ये स्फोट होतो, हे आपण ऐकलं आहे. पण टीव्हीमध्ये स्फोट झाल्याचं तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. पण असलं तरी देखील उत्तर प्रदेशमधून एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका घरातील स्मार्ट टीव्हीमध्ये मोठा स्फोर्ट झाला.
पण काही काळापूर्वी एक प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्येच एका घरात स्मार्ट टीव्हीमध्ये मोठा स्फोट झाला होता. हा स्फोट एवढा जोरदार होता की घराच्या भिंतीचाही चुराडा झाला.
आम्ही तुम्हाला सांगतो की, स्मार्ट टीव्हीमध्ये स्फोट झाल्याची फारशी घटना घडलेली नाही, परंतु तरीही स्मार्ट टीव्ही खरेदी करताना तुम्ही निष्काळजीपणा केला तर अशा प्रकारची घटना घडू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्मार्ट टिव्हीचा स्फोट का आणि कोणत्या परिस्थितीत होतो आणि युजर्सनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
स्मार्ट टीव्हीमध्ये स्फोट होण्याचं हे आहे कारण
स्मार्ट टीव्हीचा स्फोट तुम्हाला क्वचितच समजेल, परंतु तुम्ही हे पाहिलं असेल की आजकाल बाजारात असे अनेक उत्पादक आहेत जे स्थानिक स्तरावर स्मार्ट टीव्हीचे उत्पादनच करत नाहीत तर ते अगदी वाजवी दरात विकतात. अशा स्मार्ट टीव्हीमध्ये नेहमीच धोका असतो.
आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही असे स्मार्ट टीव्ही खरेदी करणे टाळावे कारण त्यांची किंमत नक्कीच कमी आहे, परंतु ते खरेदी केल्यानंतर आपल्यासाठी सर्वात मोठा सिद्ध होतात.
हे ही पाहा : Credit Card वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कोण करतं?
जर तुम्ही सामान्य टीव्ही चालवत असाल तर तुम्हाला काही खबरदारी घ्यावी लागेल. सावधगिरीमध्ये, सर्वप्रथम, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की अशा इलेक्ट्रिसिटीचा कधीही वापर करू नका ज्याचा करंट कमी जास्त होतो किंवा फ्लो एकसारखा नसतो. यासाठी अर्थिंगचा प्रॉब्लम सॉल्व करुन घ्या आणि मगच त्या सॉकेटमध्ये टीव्हीचं प्लग लावा. ज्यामुळे टीव्ही स्फोटचं प्रमाण कमी होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Tech news, Top trending, Videos viral, Viral