मुंबई, 21 एप्रिल : साप आणि मुंगूसाच्या लढाईचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मुंगूसाप्रमाणे सापाचा आणखी एक शत्रू म्हणजे उंदीर
(Snake rat fight video). तुम्हाला माहितीच असेल साप उंदराची शिकार करतो
(Snake mouse fight video). उंदीर म्हणजे सापासाठी अगदी सोपी शिकार. अवघ्या काही क्षणातच तो त्याला गिळंकृत करतो. साप आणि उंदीर आमनेसामने आले तर लढाईत कोण बाजी मारेल, असं विचारलं तर साहजिकच कुणीही सापच म्हणेल. पण साप आणि उंदराच्या लढाईचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्ही हैराण व्हाल.
छोटासा उंदीर ज्याचा साध्या मांजरासमोरही टिकाव लागत नाही. तो सापासमोर काय टिकणार असंच कुणीही म्हणेल. पण या व्हिडीओतील उंदराला पाहून मात्र सर्वजण थक्क झाले आहेत. एक छोटासा उंदीर खतरनाक सापावरही भारी पडला आहे. व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.
हे वाचा - स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याजवळ गेला तरुण; रेस्क्यूसाठी झाडावर चढला आणि... अंगावर काटा आणणारा VIDEO
व्हिडीओत पाहू शकता साप आपला फणा पसरून उंदराला घाबरतो आहे. पण उंदीर काही त्याला घाबरत नाही. तोसुद्धा या खतरनाक सापाशी सामना करण्यासाठी त्याच्यासमोर उभा राहतो. किती तरी वेळा तो सापावर हल्ला करतो. अखेर सापाला धरून त्याला जोरात चावतो.
उंदराने सापाला इतक्या मोठ्या हिंमतीने टक्कर दिली आहे. उंदीर सापाशी फक्त लढतच नाही तर या लढाईत तो बाजीही मारतो. सापावर मात करत विजयी होतो.
हे वाचा - VIDEO - चवताळलेल्या हत्तीपासून वाचवण्यासाठी पळाला पण पाय घसरला आणि...; शेवट पाहून भरेल धडकी
rasal_viper नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. उंदराच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.