मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: कोरोनाचा असाही परिणाम? लॉकडाउनमध्ये जन्मलेल्या मुलीला सर्वत्र दिसतंय सॅनिटायझर

VIDEO: कोरोनाचा असाही परिणाम? लॉकडाउनमध्ये जन्मलेल्या मुलीला सर्वत्र दिसतंय सॅनिटायझर

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका लहानग्या मुलीचा क्यूट व्हिडिओ (Video Video of Small Girl) प्रचंड व्हायरल होत आहे. यात दिसतं की ही चिमुकली आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक गोष्टीला सॅनिटायझर समजत आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 18 जुलै : कोरोना (Coronavirus) महामारीमुळे लोकांची जीवनशैली पूर्णतः बदलली. या महामारीमुळे लोकांना आपल्या जीवनात अनेक बदल करावे लागले. या कारणामुळे अनेकांना अशा काही सवयी लागल्या ज्या सहज विसरणं शक्य नाही. कोरोना काळात मॉलपासून रेस्टॉरंट, ऑफिस (Office) आणि लग्नसमारंभ (Marriage Functions) प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझरचा (Sanitizer) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जेणेकरून लोक आपले हात वारंवार सॅनिटाइज करू शकतील. अशात कोरोना महामारीच्या काळात जन्मलेली मुलं सुरुवातीपासूनच आपल्या आसपास असलेल्या सर्वांनाच हाताला सॅनिटायझर लावताना पाहात आहेत. याचा परिणाम लहान मुलांवरही होत आहे.

समोर मगर दिसताच बिबट्यानं घेतली उडी अन्...; पाहा अंगावर काटा आणणारा Live Video

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका लहानग्या मुलीचा क्यूट व्हिडिओ (Video Video of Small Girl) प्रचंड व्हायरल होत आहे. यात दिसतं की ही चिमुकली आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक गोष्टीला सॅनिटायझर समजत आहे आणि आपले हात सॅनिटाइज करत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही चिमुकली भिंतीपासून इलेक्ट्रिक सर्कीटपर्यंत प्रत्येक गोष्टीला सॅनिटायझर समजत आहे. चिमुकलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Babygram.tr (@babygram.tr)

जिवंत बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्यानं सगळेच हादरले

एकीकडे हा व्हिडिओ लोकांना हसवून त्यांचं मनोरंजन करत असतानाच दुसरीकडे मात्र सध्याची सत्य परिस्थितीही दाखवत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1.8 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. चिमुकलीची निरागसता नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. काही यूजर्सनी सोशल मीडियावर कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं आहे, की हा व्हिडिओ अतिशय क्यूट आहे. तर, काहींनी चिंता व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ Babygram.tr नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

First published:

Tags: Small girl, Video viral