मराठी बातम्या /बातम्या /Viral /

खेळण्यांऐवजी मुलीनं मागितलं 'टची' ख्रिसमस गिफ्ट, VIDEO पाहून पाणावतील डोळे

खेळण्यांऐवजी मुलीनं मागितलं 'टची' ख्रिसमस गिफ्ट, VIDEO पाहून पाणावतील डोळे

तुला ख्रिसमसाठी काय गिफ्ट हवंय, असं जेव्हा तिच्या आईनं तिला विचारलं, तेव्हा ती म्हणाली की मला फक्त आजीला मिठी मारायचीय.

तुला ख्रिसमसाठी काय गिफ्ट हवंय, असं जेव्हा तिच्या आईनं तिला विचारलं, तेव्हा ती म्हणाली की मला फक्त आजीला मिठी मारायचीय.

तुला ख्रिसमसाठी काय गिफ्ट हवंय, असं जेव्हा तिच्या आईनं तिला विचारलं, तेव्हा ती म्हणाली की मला फक्त आजीला मिठी मारायचीय.

  • Published by:  desk news
न्यूयॉर्क, 24 डिसेंबर: आपल्याला ख्रिसमस गिफ्ट (Christmas gift) म्हणून हव्या असणाऱ्या वस्तूंच्या यादीत (Wish list) एका मुलीनं अशा काही गोष्टी लिहिल्या, ज्या वाचून प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी (Everyone emotional) तरळलं. कधी कधी लहान मुलं आपल्या कृतीतून असे काही संदेश देऊन जातात की ते भल्याभल्यांना अंतर्मुख करून टाकतात. ज्या वयात महागडी खेळणी किंवा भेटवस्तू मागायच्या, त्या वयात या मुलींनं तिच्या आजीची भेट मागितली. आजीला मारायची आहे मिठी आपल्या विश लिस्टमध्ये या मुलीनं लिहिलेली सर्वात सुंदर गोष्ट होती ती म्हणजे आजीला मिठी मारण्याची इच्छा. यंदाचं ख्रिसमस गिफ्ट म्हणून आपल्याला आजीला भेटायला आवडेल, असं तिनं म्हटलं. ते वाचून भावून झालेल्या तिच्या आईनं आपल्या सासूला बोलावून घेतलं.
मुलीला दिलं सरप्राईज मुलीनं दिलेल्या विशलिस्टमधील इच्छा त्यांच्या नकळत पूर्ण करून त्यांना सरप्राईज देणं, हा मुख्य उद्देश असल्यामुळे आपल्या मुलीलाही सरप्राईज गिफ्ट देण्याचं तिच्या आईनं ठरवलं. आपल्या मुलीला न सांगता तिने तिच्या आजीला बोलावून घेतलं. ती दारात येताच मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिला सरप्राईज काय असेल, हे ओळखायला सांगितलं. मुलगी झाली भावूक मुलीच्या डोळ्यात पट्टी बांधून तिला घराबाहेर आणण्यात आलं. त्यानंतर तिची आजी गाडीतून उतरली आणि तिने तिला घट्ट मिठी मारली. आपली आजी चक्क आपल्याला भेटायचं आलेलं पाहून मुलीला कोण आनंद झाला आणि तिने आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली. हे वाचा -दुसऱ्यांना सर्टिफिकेट देण्यासाठी 8 वेळा घेतली लस, 9व्या लशीदरम्यान भयंकर अवस्था चाहत्यांच्या भावूक प्रतिक्रिया हा आपण आतापर्यत पाहिलेला सर्वोत्तम व्हिडिओ असल्याची प्रतिक्रिया काही चाहते देत आत, तर काहींना ही कल्पना बिलकूल आवडलेली नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत  1 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे तर अनेकांनी त्यावर स्वतःची प्रतिक्रियादेखील दिली आहे. प्रेक्षक या व्हिडिओनं चांगलेच भावूक झाले आहेत.
First published:

Tags: America, Christmas

पुढील बातम्या