Home /News /viral /

बापरे! शेकडो फूट उंचावर चिमुकलीचा Dangerous Stunt; काळजाचा ठोका चुकवणारा Video

बापरे! शेकडो फूट उंचावर चिमुकलीचा Dangerous Stunt; काळजाचा ठोका चुकवणारा Video

मोठ्या माणसांनाही घाम फुटेल असा स्टंट या चिमुकलीने केला.

  मुंबई, 04 जुलै : लहान मुलांनी काही वेगळं केलं की त्याचं कौतुक सर्वांना वाटतं. पण सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वांना धडकी भरली आहे (Small Girl Stunt Video). चिमुकलीने असा खतरनाक स्टंट केला की त्यामुळे नेटिझन्स तिच्या पालकांवर भडकले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल (Small Girl Showing Dangerous Stunt). जमिनीपासून शेकडो फूट उंचावर एक मुलगी एका लाकडी पुलावर चालताना दिसली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही श्वास थांबेल.  व्हिडीओत पाहू शकता एक मुलगी जमिनीपासून शेकडो फूट उंचावर आहे. एक खतरनाक पूल ती ओलांडताना दिसत आहे. तिने फक्त एका दोरीला हात धरला आहे. हा ब्रीज दोरी आणि लाकडी फळ्यांपासून बनलेला आहे. फळ्यांमध्ये बरंच अंतर दिसत आहेत. चिमुकली सुरुवातीला लाकडी फळीवरून उडी मारते. पण नंतर जेव्हा पुढील फळीवर तिचा पाय पोहोचत नाही तेव्हा ती त्यांना जोडणाऱ्या सिंगल दोरीवरून चालण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आपल्या हृदयाची धडधड अधिकच वाढते. हे वाचा - बापरे! बुल्डोझरला लटकून गरागरा फिरताना फुटली कवटी, कॅमेऱ्यात कैद झाली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL कधी लाकडी फळ्यांवर उड्या मारत तर कधी केबलवरून चालत ती हळूहळू पुढे जाते आणि बिनधास्त हा पूल पार करताना दिसते.  सुरक्षेसाठी तिच्या शरीरावर एक जॅकेट, बेल्ड आणि हातात केबल आहे. मुलगी हळूहळू करून ब्रीजच्या शेवटपर्यंत पोहोचते तेव्हा कुठे आपल्या जीवात जीव येतो.
  @earthdixe इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  हा व्हिडीओ कधीच आहे, तो का आणि कसा शूट केला गेला याबाबत माहिती नाही. पण मुलीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जाते आहे. व्हिडीओ पाहून बहुतेक नेटिझन्स भडकले आहे. मुलीच्या पालकांवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. मुलीला इतका खतरनाक स्टंट त्यांनी करू दिलाच कसा? असा सवाल काही युझर्सनी विचारला आहे. तर काहींनी मुलीच्या हिमतीचं कौतुक केलं आहे. हे वाचा - VIDEO : नदीच्या पूरामध्ये थरार, स्वत:ची पर्वा न करता वाचवला दोघांचा जीव तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमकं काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची मुलं असे खतरनाक स्टंट करणार नाहीत, याचीही काळजी घ्या.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या