झोप इतकी अनावर झाली, जेवता जेवताच धाडकन पडला चिमुरडा, VIDEO पाहून कोसळेल हसू!

झोप इतकी अनावर झाली, जेवता जेवताच धाडकन पडला चिमुरडा, VIDEO पाहून कोसळेल हसू!

Child Cute Video: लहान मुलांच्या निरागसपणावर फिदा होणार नाही असं कोण आहे? या मुलाचं हे झोपाळूपण तुम्हाला नक्की आवडेल.

  • Share this:

मुंबई, 4 मार्च : सोशल मीडियावर बहुतेकदा विविध प्रकारचे गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला जो बघून तुम्ही अगदी पोट धरून हसाल आणि तुम्हाला तुमच्या बालपणीचे दिवस आठवतील हे नक्की. (small child video viral on twitter)

या व्हिडिओत एक लहान मुलगा दिसतो आहे. हा लहान मुलगा काहीतरी खातो आहे. आणि जेवता जेवताच अचानक काहीतरी घडतं. ही गोष्टच या व्हिडिओला एकदम फनी बनवते. (funny video child eating and sleeping social media)

हा मुलगा खातो आहे आणि चक्क खाता-खाताच त्याला झोप येऊ लागते. ही घटना इतकी निरागस आहे, की ती पाहून कुणालाही हसायला येईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होतो आहे. (cute child eating video)

हेही वाचा साताऱ्यात पेट्रोलने भरल्या दोन विहिरी, चोराच्या प्रतापाने गावात खळबळ VIDEO

हा व्हिडिओ ---- नावाच्या युजरनं शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यानं कॅप्शन लिहिली आहे, 'काय होतं ते बालपण जेव्हा अगदी जेवता-जेवताही झोप येऊन जायची.' हा व्हिडिओ खरोखरच मजेदार आहे. (funny video child sleeps while eating)

यात एक लहान मुलगा हातात प्लेट घेऊन बसला आहे. तो आपल्या हातानं खातो आहे. पण खाता-खाताच त्याला झोप येऊ लागते. त्याचे डोळे मिटायला लागतात. तो हातात घास घेतो पण डोळ्यांवर झोप इतकी दाटून येते, की तो धाडकन खाली पडतो. पडल्यावर एकाएकी त्याची झोप मोडते.

हेही वाचा VIDEO: ही तर आळशीपणाची हद्दच; पाळीव कुत्रा शांतपणे पाहात होता दरोडा

व्हिडिओ अनेकांना खूप आवडतो आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून जास्त लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडिओवर लोक खूप मस्त कमेंट्स करत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमचं बालपण आठवतं आहे का?

Published by: News18 Desk
First published: March 4, 2021, 10:10 PM IST

ताज्या बातम्या