मुंबई, 03 मे : लहान मुलांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लहान मुलं सोशल मीडिया अकाऊंट स्वतः हँडल करू शकत नसले तरी त्यांचे पालक आपल्या अकाऊंटवर किंवा मुलांच्या नावे अकाऊंट तयार करून त्यावर त्यांचे वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करतात. अशाच एका मुलाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ज्याने व्हिडीओत आपल्या वडिलांना असं काही सांगितलं जे सध्याच्या घडीला खरंतर सर्व पालकांना लागू पडतं
(Child viral video).
पालकांच्या एका कृतीला किंवा त्यांच्या सवयीला वैतागलेला हा चिमुकला आहे. अखेर तो व्यक्त झाला. त्याने कॅमेऱ्यासमोरच आपल्या वडिलांवर आपला राग काढला. त्याने फक्त आपल्याच पालकांना नव्हे तर सर्व पालकांना मोठा धडा दिला आहे.
व्हिडीओत पाहू शकता एक मुलगा कारमध्ये बसला आहे. त्याच्या हातात उसाचा रस आहे. तो रस पिण्याचा आनंद घेत असतो तोच त्याचे वडील त्याचा मोबाईलवर व्हिडीओ काढत असतात. सोशल मीडियासाठी व्हिडीओ बनवण्यासाठी म्हणून त्याला लाडात हाक मारतात. त्यानंतर मुलगा इतका वैतागतो की तो आपल्या वडिलांना चांगलंच सुनावतो.
हे वाचा - Yummy! 3 वर्षांच्या चिमुकल्याने इवल्याशा हातांनी बनवली इतकी भारी Dish; Recipe Video पाहूनच तोंडाला सुटेल पाणी
मुलगा म्हणतो, "यार काय आहे तुमचं. म्हणजे जेव्हा मी खातो, पितो, प्रत्येक ठिकाणी तुम्ही कॅमेरा घेऊन घुसता. काही म्हणजे काहीच करू देत नाही. माझं आयुष्यात फक्त कॅमेऱ्यात घुसून राहिलं आहे" मुलाचं बोलणं ऐकून त्याचे वडीलही हैराण होतात. "तू उसाचाच रस पित आहेस ना?", असा प्रश्नही त्याला विचारतात.
molikjainhere नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मुलाने वैतागून म्हणा किंवा मजा म्हणून म्हणा जे काही सांगितलं ते सत्य आहे, अशीच प्रतिक्रिया बहुतेक नेटिझन्सनी दिली आहे. एका युझरने मुलाने उसाचा रस पिऊन सत्य सांगितलं आहे, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. बहुतेकांनी मुलाने सांगितलं सत्य सध्याच्या काळातील कटू सत्य असल्याचं म्हटलं आहे.
हे वाचा - VIDEO - नादच करायचा नाय! हळदीत नाचता नाचता तरुणीच्या प्रेमात पडला; पठ्ठ्याच्या मोबाईल नंबर देण्याच्या स्टाईलवर सर्वजण फिदा
याबाबत तुम्हाला काय वाटतं आहे, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.