Home /News /viral /

Sleeping Disorder : 20 वर्षं लागत नव्हती शांत झोप; अखेर 'हा' उपचार ठरला प्रभावी

Sleeping Disorder : 20 वर्षं लागत नव्हती शांत झोप; अखेर 'हा' उपचार ठरला प्रभावी

ज्यो पॅनेल यांची (Joe Pannell) झोपेसंदर्भातली समस्या किती त्रासदायक होती, त्याची तीव्रता अनेकांना तितकीशी समजली नसेल. झोप न येत असल्यामुळे त्यांनी झोपेची जागाही बदलून पाहिली.

मुंबई, 17 जानेवारी : अनेक जणांना रात्री शांतपणे झोप लागत नाही. काही जण झोप येत नसल्यामुळे रात्र रात्र जागतात. (Sleeping Disorder) अनेक जणांना या समस्येला तोंड द्यावं लागतं. विविध प्रकारचे उपाय करूनही त्यांना झोप येत नाही. त्यांचं आणि झोपेचं समीकरण काही केल्या जुळत नाही. अशीच समस्या ब्रिटनमधल्या ज्यो पॅनेल (Joe Pannell) नावाच्या एका व्यक्तीला होती. ते लेखक आणि व्यावसायिक आहेत. हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, की या व्यक्तीला गेल्या तब्बल 20 वर्षांपासून ही समस्या भेडसावत होती. त्यांनी या कालावधीमध्ये रात्री शांतपणे झोप येण्यासाठी हरेक तऱ्हेचे उपाय करून पाहिले. (Insomnia Treatment) अनेक प्रकारची औषधं घेतली; मात्र कोणताच उपाय त्यांच्या झोप न येण्याच्या समस्येवर काम करू शकला नाही. ज्यो पॅनेल यांची (Joe Pannell) झोपेसंदर्भातली समस्या किती त्रासदायक होती, त्याची तीव्रता अनेकांना तितकीशी समजली नसेल. झोप न येत असल्यामुळे त्यांनी झोपेची जागाही बदलून पाहिली. घराच्या बाहेर, घराच्या आत, छतावर, एका रूममध्ये अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या झोपेची जागा बदलून पाहिली; मात्र तरीदेखील त्यांना या समस्येवर मात करता येत नव्हती. शेवटी त्यांनी एका गावात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. तरीदेखील त्यांच्या समस्येवर काही उपाय निघाला नाही. जेव्हा ज्यो पॅनेल (Joe Pannell) 14 वर्षांचे होते, तेव्हापासून त्यांना हा त्रास जाणवायला लागला. Daily Starच्या वृत्तानुसार, त्यांना एसेक्समध्ये एका सरकारी शाळेतून काढून डेवॉनमधल्या एका खासगी शाळेत घालण्यात आलं. तिथपासूनच त्यांना झोपेचा त्रास जाणवायला लागला. यानंतर पुढची तब्बल 20 वर्षं त्यांना या समस्येशी झगडावं लागलं. रात्री शांतपणे झोप यावी, यासाठी ध्यानधारणा, अॅक्युपंक्चर, गरम पाण्याने अंघोळ, जमिनीवर झोपणं, व्यायाम असे अनेक प्रयत्न त्यांनी केले; मात्र तरीही काहीच उपयोग होत नव्हता. रात्र-रात्रभर ते जागत होते. अन् अखेर आली शांत झोप  37 वर्षांच्या ज्यो यांनी शेवटी कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी ( CBTI) म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांच्या मदतीने निद्रानाशावर करण्यात येणारा उपचार केला. यानंतर अखेर 20 वर्षांनी त्यांना त्यांची शांत झोप परत मिळाली आहे. 10 वर्षांपासून त्यांनी या उपचार पद्धतीबाबत ऐकलं होतं; मात्र त्यांनी हा उपचार कधी केला नव्हता. तणाव, चिंता आणि त्यांच्यात असलेल्या नकारात्मक विचारांमुळे त्यांना झोप येत नाही, याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांच्या मदतीने उपचार पद्धती अंगीकारली. आता ते पूर्णपणे यातून बाहेर आले आहेत. आता त्यांना आधीसारखी शांत झोप येत आहे.
First published:

Tags: Health, Viral

पुढील बातम्या