बुकेरेस्ट, 29 जानेवारी : आज रविवार म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच ठरला. यादरम्यान एका स्पर्धेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वांना धडकी भरली आहे. अगदी काही क्रीडाप्रेमींनीही हा व्हिडीओ भयानक असल्याचं म्हटलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही असा खेळ नको रे बाबा, असंच म्हणाल. असं या स्पर्धेत आहे तरी काय पाहुयात.
रोमानियात आयोजिक करण्यात आलेली ही स्पर्धा. RXF स्लॅप फायटिंग चॅम्पियनशिप. आता नावावरून तुम्ही ही स्पर्धा कसली ते ओळकलं असेल. हो स्लॅप म्हणजे थप्पड मारण्याची ही स्पर्धा. स्पर्धा विचित्र असली तरी किती सोपी आहे, असंही तुम्हाला वाटेल. पण जितकी वाटते तितकी ही स्पर्धा सोपी बिलकुल नाही. आता का? तर हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतरच समजेल.
हे वाचा - U19 Womens WC: टीम इंडियाने शफालीच्या नेतृत्वाखाली घडवला इतिहास
या चॅम्पियनशिपमध्ये विजेत्यासाठी एक बेल्ट आणि एक रक्कम बक्षीस म्हणून ठेवण्यात आली. पण ती जिंकण्यासाठी त्यापेक्षा किती तरी जास्त किंमत स्पर्धकाला मोजावी लागली आहे. व्हिडीओत स्पर्धकाचा चेहरा पाहिलात तर हादरालच. त्याचा डावा गाल ज्यावर थप्पड मारण्यात आले आहेत, तो सूजला आहे. असा सूजला आहे की त्याचा चेहरा विचित्र दिसू लागला आहे. चेहऱ्याचा पूर्ण नक्शाच बदलला आहे. त्याच्या चेहऱ्यावर रक्तही दिसतं आहे.
या स्पर्धकाचं नाव कॉम्सा सोरिन आहे. जो फायनल राऊंडमध्ये पोहोचला होता. 30 मिनिटं तब्बल 10 राऊंड झाले आणि त्याच्या चेहऱ्याची अशी अवस्था झाली. तरी त्याने माघार घेतली नाही, हार मानली नाही. तो शेवटपर्यंत खेळला आणि अखेर जिंकला.
हे वाचा - Australian Openमध्ये 'जोकर'ने घडवला इतिहास, विजेतेपदानंतर घातलं खास जॅकेट
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बहुतेकांना धडकी भरली आहे. हा खेळ अनहेल्दी, भयानक असल्याचं म्हटलं आहे, याला कायद्याने परवानगी कशी काय देण्यात आली, असा सवालही काही युझर्सनी केली आहे.
This guy's face swelled like crazy and he's bleeding but he's still going, can't be too healthy pic.twitter.com/jSIae09dt2
— Matysek (@Matysek88) January 16, 2023
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं? तुम्हाला हा खेळ कसा वाटला? असा खेळ खेळण्याची हिंमत तुमची तरी होईल का? तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports, Viral, Viral videos