मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सहा वर्षांच्या मुलीनं भावंडांसह विकत घेतलं 5 कोटींचं घर, पॉकेट मनीतून साकारलं दिव्य

सहा वर्षांच्या मुलीनं भावंडांसह विकत घेतलं 5 कोटींचं घर, पॉकेट मनीतून साकारलं दिव्य

वयाच्या सहाव्या वर्षी स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न एका चिमुकलीनं साकार केलंय. तिची घर घेण्याची ही गोष्ट सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

वयाच्या सहाव्या वर्षी स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न एका चिमुकलीनं साकार केलंय. तिची घर घेण्याची ही गोष्ट सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

वयाच्या सहाव्या वर्षी स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न एका चिमुकलीनं साकार केलंय. तिची घर घेण्याची ही गोष्ट सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

  • Published by:  desk news

सिडनी, 21 डिसेंबर: एका सहा वर्षांच्या मुलीनं (Six Year old girl) तिच्या भावंडांसह (Siblings) स्वतःचं घर (Own house) घेण्याची किमया केली आहे. अनेकांना आयुष्यभर स्वतःच्या घराचं स्वप्न साकारता येत नाही. काहीजणांकडे पैसे नसल्यामुळे ते घर घेऊ शकत नाहीत, तर काहींनी स्वतःचं घर घेण्याची इच्छादेखील नसते. मात्र ज्यांना स्वतःचं घर घ्यायचं असतं, त्यांना किमान काही वर्षांचा संघर्ष करून पैसे साठवावे लागतात आणि ते घरात गुंतवावे लागतात. ऑस्ट्रेलियातील मुलींनी मात्र वयाच्या सहाव्या वर्षीच स्वतःचं घर घेतलं आहे.

वडिलांनी दिली ऑफर

या मुलींचे वडील कॅम मॅकलिएन हे ऑस्ट्रेलियात सिडनीपासून काही अंतर दूर असलेल्या भागात प्रॉपर्टी डिलर म्हणून काम करतात. सध्या कोरोनामुळे या भागातील जागांचे भाव खाली आले आहेत. अशा परिस्थितीत जर या भागात जागेमध्ये गुंतवणूक केली, तर भविष्यात त्याचे जोरदार फायदे मिळू शकतील, असं त्यांना वाटलं. त्यासाठी आपल्या तीन मुलांच्या नावे घर घेण्याचा त्यांचा विचार होता. मात्र मुलांना आयतं घर न देता त्यांना त्यासाठी काहीतरी कष्ट करायला लावून पैसे कमावण्याचे संस्कार द्यावेत, असं त्यांनी ठरवलं.

मुलांनी कमावले पैसे

मुलांना त्यांनी काही काळ घरातील कामे करायला सांगितली. यात घरातील पुस्तकाचे कपाट आवरून ठेवणं, स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवणं, घरकामात मदत करणं यासारख्या गोष्टींचा समावेश होता. ही सगळी कामं करून प्रत्येक मुलानं 4.5 लाख रुपये कमावले. त्यानंतर त्यात स्वतःकडील काही पैसे घालून त्यांनी मुलांच्या नावे घरं घेतली.

हे वाचा - ...आणि डबडबलेल्या डोळ्यांसमोर भावाचा संसार जळून खाक झाला, गावगुंडाचा हैदोस

भविष्यात वाढणार किंमत

सध्या मंदीचा काळ असला, तरी भविष्यात या घरांच्या किंमती वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते स्वतः प्रॉपर्टी डिलिंगबाबतच्या एका पुस्तकाचे लेखक असून याबाबत त्यांचा गाढा अभ्यास आहे. मुलांना कष्टाची जाणीव व्हावी आणि त्याचा सन्मान राहावा, यासाठीच आपण हा प्रयोग केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Australia, Money