Home /News /viral /

'त्या वेदना आवडतात...'; अविवाहित महिलेला लागली मुलं जन्माला घालायची चटक; आतापर्यंत 8 मुलांना दिलाय जन्म

'त्या वेदना आवडतात...'; अविवाहित महिलेला लागली मुलं जन्माला घालायची चटक; आतापर्यंत 8 मुलांना दिलाय जन्म

आठ मुलांची आई मेरी सरकारी भत्त्यावर जीवन जगते. तिला कोणतीही नोकरी नाही. गर्भधारणेचे 9 महिने आणि बाळाच्या जन्मानंतर त्याला दूध पाजणं तिला आवडतं

    नवी दिल्ली 19 ऑक्टोबर : एका महिलेसाठी मुलाला जन्म देणं आणि आई बननं हा अनुभव खूप खास असतो. 9 महिन्यांच्या प्रेग्नंसीमध्ये महिलेचं शरीर (Changes in Body During Pregnancy) अनेक बदलांमधून जातं. हार्मोन्समध्ये बदल झाल्यानं महिलेला मानसिकरित्याही खूप त्रास होतो. सोबत शारीरिक बदलही होतात. मात्र, जेव्हा बाळ कुशीत येतं, तेव्हा महिला सगळ्या वेदना विसरते. मात्र, एखाद्या महिलेला गरोदर राहण्याचीच सवय लागली तर? यूकेच्या बिर्मिंघममध्ये राहणाऱ्या महिलेच्या बाबतीत असंच काहीसं आहे. कमाईचं कोणतंही साधन नसताना तिनं आठ मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे तिला आणखी मुलांना जन्म देण्याची इच्छा आहे. तिला मुलांना जन्म द्यायला आणि त्यांचा सांभाळ करायला फार आवडतं (Woman Addicted Of Being Pregnant). सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती या आठ मुलांची सिंगल मदर (Single Mother) आहे. याला म्हणतात दरारा! ऐटीत एण्ट्री करत उंदरानं केली मांजराची हवा टाईट; पाहा VIDEO आठ मुलांची आई मेरी सरकारी भत्त्यावर जीवन जगते. तिला कोणतीही नोकरी नाही. अशा परिस्थितीत ती सरकारकडून मिळालेल्या भत्त्यावर स्वतःची आणि तिच्या आठ मुलांची काळजी घेते. तिने सांगितलं, की तिला माहिती आहे की लोक तिला वेडं समजतात. पण तिला मुले जन्माला घालण्यात मजा येते. गर्भधारणेचे पहिले 9 महिने, आणि बाळाच्या जन्मानंतर त्याला दूध पाजणं तिला आवडतं. यामुळे तिला आता आणखी मुले पाहिजे आहेत. मेरीनं आपल्या प्रेग्नंसीबद्दल खुलासा करत म्हटलं, मला माहिती आहे की लोकांना मी अशा प्रकारे बाळांना जन्म देणं आवडत नाही. मात्र, मला याचा काहीही फरक पडत नाही. तिचं आपल्या मुलांवर प्रेम आहे आणि तिच्यासाठी फक्त हे प्रेमच महत्त्वाचं आहे. पुढे तिनं म्हटलं, की तिला गरोदर राहण्याचं जणू व्यसनच लागलं आहे. तिला लेबर पेन आणि नंतर बाळांना दूध पाजणं आवडतं. सध्या मेरीची सर्वात लहान मुलगी ओलिवियाला दूध पाजण्यास आणि तिचे डायपर बदलण्यात मेरीला भरपूर आनंद मिळतो. Bill Gates यांच्या मुलीनं बांधली लग्नगाठ; रिसेप्शनचा खर्च वाचून चक्रावून जाल मुलं जन्माला घालण्याच्या सवयीमुळे मेरी चर्चेत आहे. मेरीकडे कमाईचं कोणतंही साधन नाही. ती सरकारकडून मिळणाऱ्या भत्त्यावरच दिवस काढते. दरवर्षी तिला सरकारकडून ३१ लाख रूपये मिळतात. यानंतरही आणखी बाळांना जन्म देण्याची इच्छा असल्याच्या वक्तव्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका केली. काहींनी तिला दुसऱ्या मुलांना दत्तक घेण्याचा सल्ला दिला. तिनं सांगितलं, की अनेकांनी तिला काहीतरी नोकरी करण्याचा सल्ला दिला. मात्र, तिला आपल्या आठ मुलांचा सांभाळ करण्यातच अधिक मजा येते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Pregnancy, Small baby

    पुढील बातम्या