मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अंघोळीपासून किसपर्यंत सर्वकाही आलं जगासमोर; VIDEO MEETING चं हटके किस्से

अंघोळीपासून किसपर्यंत सर्वकाही आलं जगासमोर; VIDEO MEETING चं हटके किस्से

व्हिडीओ मिटिंगच्या गंमती जंमती… आंघोळीपासून गुप्त गोष्टींपर्यंत सर्वकाही आलं जगासमोर

व्हिडीओ मिटिंगच्या गंमती जंमती… आंघोळीपासून गुप्त गोष्टींपर्यंत सर्वकाही आलं जगासमोर

व्हिडीओ मिटिंगच्या गंमती जंमती… आंघोळीपासून गुप्त गोष्टींपर्यंत सर्वकाही आलं जगासमोर

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 27 मे: दीड वर्षापूर्वी कोरोनाने जगभर थैमान घालायला सुरुवात केली आणि माणसांच्या प्रत्यक्ष भेटण्यावर बंधनं आली. झूम (Zoom), गुगल मीट (Google Meet) आणि अन्य तशाच व्हिडिओ चॅट सर्व्हिसेस (Video Chat Services) वापरणं हा बैठका, चर्चा आणि संवादासाठी एकमेव मार्ग उरला. वेगवेगळ्या वयोगटांतल्या व्यक्तींनी हा मार्ग अनुसरला. कारण त्याशिवाय पर्यायच नव्हता; पण जसजसा याचा वापर वाढू लागला, तसतसे त्यातले धोकेही लक्षात येऊ लागले. लोकांना या प्रकारच्या संवादाची सवय नसल्यामुळे त्यातून अनेक गमतीजमती घडल्या, काही गंभीर प्रकारही घडले. कॅमेरा ऑफ आहे आणि माइक म्यूट आहे असं समजून अनेकांनी केलेल्या विचित्र गोष्टी जगाच्या नजरेला पडल्या आणि अनेकांनी आपलं हसं करून घेतलं. त्यामुळे त्या व्यक्तींना नंतर ओशाळेपण आलं; पण नेटकऱ्यांना मात्र पुढचे कित्येक दिवस टिंगलटवाळीसाठी विषय मिळाले.

अशाच काही मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा...

- शर्ट न घालताच कॅमेऱ्यावर: ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यासोबत झूम व्हिडिओ कॉल सुरू असताना एक उद्योगपती चक्क आंघोळीला गेले होते. त्या वेळी ते कॅमेरा बंद करायला विसरले. त्यामुळे जे व्हायचं तेच झालं. या मीटिंगचा स्क्रीनशॉट नंतर सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला. त्यात हा उद्योगपती अंगावर शर्ट नसलेल्या (Shirtless on Camera) अवस्थेत मीटिंगच्या चॅट बॉक्समध्ये असल्याचं दिसत आहे.

- अशाच एका झूम व्हिडिओ कॉलची एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात पती मीटिंगमध्ये व्यग्र असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात त्याची पत्नी खोलीत येते आणि त्याला किस करण्यासाठी खाली वाकते. हडबडलेला पती तिला ढकलून देतो. 'हा काय नॉन-सेन्स आहे. कॅमेरा सुरू आहे,' असं तो पत्नीला सांगत असल्याचं ऐकू येतं. पत्नी मात्र  या रागावलेल्या पतीकडे पाहून स्मितहास्य करताना दिसते.

- आणखी एक किस्सा असा आहे, की झूम मीटिंगमधल्या विनोदांपैकी सर्वांत मोठा विनोद ठरला. त्या झूम क्लासची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्या क्लासमध्ये श्वेता नावाची मुलगी अजाणतेपणे तिच्या सेक्स-अॅडिक्ट (Sex-Addict) (सेक्सचं व्यसन असणाऱ्या) मित्राची गोष्ट कुणाला तरी सांगत होती. ती गोष्ट मीटिंगमधल्या सर्वांना ऐकू गेली. कारण तिने माइक म्यूट करतोय असं समजून स्पीकर म्यूट (Mute) केला होता.

- अमेरिकेतल्या ओहियोचे स्टेट सिनेटर अँड्र्यू ब्रेन्नर व्हर्च्युअल मीटिंगदरम्यान ड्रायव्हिंग करत असल्याचं व्हिडिओत दिसलं. त्यांच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळे फिल्टर वापरून ते घरीच असल्याचा आभास निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र सत्य लपून राहिलं नाही. योगायोगाने ती व्हर्च्युअल मीटिंग (Virtual Meeting) धोकादायक ड्रायव्हिंग या विषयाबद्दलची होती. अशा ड्रायव्हिंगचे परिणाम प्राणघातक असल्याने त्यावर कायदे आणण्याच्या विषयावर या मीटिंगमध्ये चर्चा होत होती. त्यामुळे अँड्र्यू यांना प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं.

- ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत ज्येष्ठ पत्रकार रॉबर्ट पेस्टन (Robert Peston) पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याआधी माइक अनम्यूट करायचं विसरले. त्यामुळे ते काय बोलतायत ते पंतप्रधानांना ऐकूच गेलं नाही. पंतप्रधानांनी कॉल अनम्यूट (Unmute) करण्यासाठी खूण करून त्यांना सांगितलं; मात्र त्यांनी अनम्यूट करेपर्यंत पंतप्रधान पुढच्या प्रश्नाकडे गेले होते.

First published:

Tags: Live video viral, Shocking video viral