मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बॉस असावा तर असा! 'या' ऑफिस कर्मचाऱ्यांना मिळालं सर्वात मोठं सरप्राईज

बॉस असावा तर असा! 'या' ऑफिस कर्मचाऱ्यांना मिळालं सर्वात मोठं सरप्राईज

खरं तर बॉस म्हटलं, की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर एखादा खडूस चेहरा अवतरतो. बॉस म्हणजे अशी व्यक्ती, जी काम पूर्ण होण्यासाठी तुमच्या मागे लागते आणि नेमकं वीकेंडला तुम्हाला जास्त काम देते.

खरं तर बॉस म्हटलं, की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर एखादा खडूस चेहरा अवतरतो. बॉस म्हणजे अशी व्यक्ती, जी काम पूर्ण होण्यासाठी तुमच्या मागे लागते आणि नेमकं वीकेंडला तुम्हाला जास्त काम देते.

खरं तर बॉस म्हटलं, की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर एखादा खडूस चेहरा अवतरतो. बॉस म्हणजे अशी व्यक्ती, जी काम पूर्ण होण्यासाठी तुमच्या मागे लागते आणि नेमकं वीकेंडला तुम्हाला जास्त काम देते.

    मुंबई,29 जुलै-   खरं तर बॉस म्हटलं, की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर एखादा खडूस चेहरा अवतरतो. बॉस म्हणजे अशी व्यक्ती, जी काम पूर्ण होण्यासाठी तुमच्या मागे लागते आणि नेमकं वीकेंडला तुम्हाला जास्त काम देते. शिवाय पगारवाढ मागितल्यावर 'तुम्ही असं किती काम करता,' असं विचारते. खरंय ना?; मात्र सगळेच बॉस तसे नसतात. ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीच्या बॉसने आपल्या संपूर्ण टीमला चक्क फॉरीन टूरला नेलं. ही टूर थोडीथोडकी नव्हे, तर 14 दिवसांची होती. या टूरचा सर्व खर्च बॉसने स्वतःच्या पैशांनी केला आणि ही वर्किंग टूर असल्यामुळे  कर्मचाऱ्यांना या 14 दिवसांचा पगारही मिळाला. इंटरनेटवर सध्या सगळीकडे या बॉसची चर्चा सुरू आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या सूप एजन्सी (Soup Agency) नावाच्या कंपनीचे एमडी कात्या वकुलेंको यांनी या ट्रिपचं आयोजन केलं होतं. या टूरसाठी ते आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन इंडोनेशियातलं प्रसिद्ध टुरिस्ट डेस्टिनेशन असलेल्या बाली (Soup Agency Bali trip) बेटांवर घेऊन गेले होते. ही वर्किंग-ट्रिप होती. म्हणजेच या 14 दिवसांमध्ये कर्मचारी एन्जॉय करत होते आणि कामही सुरू होतं. या टूरमध्ये स्टाफने स्विमिंग, स्नॉर्कलिंग, क्वाड बाइक रायडिंग, योगा अशा बऱ्याच टीम-बाँडिंग अ‍ॅक्टिव्हिटीज केल्या. बालीमधल्या एका लक्झरी बंगल्यात या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांचं बाँडिंग वाढण्यासाठी टूर कात्या म्हणाले, की एका ठिकाणी सोबत काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलं बाँडिंग (Foreign tour for employee bonding) असणं गरजेचं आहे. केवळ काम करतानाच नव्हे, तर काम झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांमध्ये एकमेकांप्रति एकीची भावना असणं आवश्यक आहे. कोविड-19 मुळे आता सर्व जण रिमोटली काम करत आहेत. कामाची ही नवीन पद्धत आता जगभरात स्वीकारली गेली आहे. आम्ही ती एका नव्या पातळीवर नेली. एन्जॉयही आणि कामही कंपनीचे डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (Soup Agency viral video) कुमी हो यांनी सांगितलं, की हा अगदी रिफ्रेशिंग अनुभव होता. आपण आयुष्यात हा अनुभव कधीच विसरणार नाही असंही ते म्हणाले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भरपूर एन्जॉय तर केलंच; मात्र अगदी प्रॉडक्टिव्ह असं कामदेखील केलं. शिफ्टमध्ये वर्कलोड मॅनेज केल्यामुळे सर्वांनाच एन्जॉय आणि काम करता आलं, असं त्यांनी स्पष्ट केलं. (हे वाचा:Parle ठरला देशातला सर्वांत मोठा FMGC ब्रँड; सलग 10 वर्ष पहिल्या स्थानावर ) सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचा एन्जॉय करतानाचा व्हिडिओ (Soup Agency tour video) सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यात काही कर्मचारी सीफूड एन्जॉय करताना दिसत आहेत. तसंच यात योगा, हायकिंग आणि मीटिंग अटेंड करताना कॉकटेल घेतानाची दृश्यंही दिसत आहेत. वेगवेगळ्या विभागातले कर्मचारी या निमित्ताने एकत्र आले होते. या सर्वांनी मिळून एका कर्मचाऱ्याचा वाढदिवसही साजरा केला. हा व्हिडिओ सध्या भरपूर व्हायरल होतो आहे. कित्येक जण या बॉसचं भरपूर कौतुक करत आहेत. तसंच, भरपूर जण या कंपनीत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.दरम्यान, यानंतर आता कंपनी पुढच्या ट्रिपचं प्लॅनिंग करत आहे. तेव्हा युरोपातल्या एखाद्या देशात जाण्याचा विचार सुरू आहे.
    First published:

    Tags: Money, Viral news

    पुढील बातम्या