• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • रस्त्यावरील पदार्थ चव घेऊन खाता? हा VIDEO पाहाल तर झोप उडेल, नागरिक संतापले

रस्त्यावरील पदार्थ चव घेऊन खाता? हा VIDEO पाहाल तर झोप उडेल, नागरिक संतापले

विक्रेत्याच्या या किळसवाण्या प्रकारावर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

 • Share this:
  रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्यांवरचे पदार्थ अनेक जण खातात. असे काही पदार्थ विशिष्ट चवीमुळे प्रसिद्ध होतात. हातगाडीवर हे पदार्थ तयार करताना स्वच्छता बाळगली जात आहे का किंवा संबंधित हातगाडीच्या परिसरात स्वच्छता (Cleanliness) आहे का, याकडे नकळत दुर्लक्ष केलं जातं. असे पदार्थ तयार करताना किंवा हातगाडीच्या परिसरातल्या अस्वच्छतेबाबत यापूर्वी अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाले आहेत. कोरोनाकाळात (Corona) अशा हातगाडीवरच्या अन्नपदार्थांच्या विक्रीवर बंधनं आहेत. लोकही संसर्गाच्या भीतीने पूर्वीइतकं या पदार्थांना प्राधान्य देत नसल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी अन्नपदार्थ तयार करताना पुरेशी काळजी घेणं, स्वच्छता ठेवणं अपेक्षित आहे; मात्र या साध्या नियमाला एका विक्रेत्याने हरताळ फासला असून, त्याच्या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 'अरे हा तर लोकांच्या जिवाशी खेळतोय,' अशा प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स देताना दिसत आहेत. याबद्दलचं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे. हे ही वाचा-गर्भवती लेकीच्या मृतदेहाचे जमिनीत गाडलेले 12 तुकडे काढून केलं अंत्यसंस्कार
  'स्वच्छता पाळा, आजार दूर ठेवा' असं म्हटलं जातं. त्यामागे मोठा अर्थ आहे. घर, घराचा परिसर स्वच्छ ठेवल्यास रोगराई येत नाही आणि लोकांचं आरोग्य (Health) चांगलं राहतं. या नियमाचं पालन अन्नपदार्थ तयार करतानादेखील महत्त्वाचं आहे; मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणाऱ्यांनी पाहिला, तर त्यांना नक्कीच धक्का बसेल. इन्स्टाग्रामवरील (Instagram) jattwadi.style या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला (Streetfood) अन्नपदार्थांची विक्री करणारा माणूस रस्त्यावर साठलेल्या घाण पाण्यात भांडी धूत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. तसंच तो पुन्हा त्याच भांड्यांमध्ये लोकांना अन्नपदार्थ खायला देत असल्याचंही दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक वैतागले असून, या माणसाच्या कृतीवर सडकून टीका करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाख 38 हजारहून अधिक लोकांनी पाहिला असून, अनेक युजर्सनी या व्हिडिओतल्या विक्रेत्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर एक युजर कॉमेंटमध्ये (Comment) उपरोधाने लिहितो, की हा तर कोविडचा अँटीडोस आहे. दुसरा एक युजर लिहितो, की हा तर एक्स्ट्रा मसाला आहे. एकूणच सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असलेल्या या व्हिडिओतल्या विक्रेत्याची भांडी घासण्याची पद्धत पाहिल्यानंतर आयुष्यात पुन्हा कधीच रस्त्याकडेला उभ्या असलेल्या विक्रेत्यांकडचे अन्नपदार्थ खाणार नाही, असा निश्चय कोणीही मनोमन केल्याशिवाय राहणार नाही.
  First published: