Home /News /viral /

गावातील कच्च्या रस्त्यावर त्याच्यासमोर उभा होता 'मृत्यू'; काळजात धस्स करणारा VIDEO

गावातील कच्च्या रस्त्यावर त्याच्यासमोर उभा होता 'मृत्यू'; काळजात धस्स करणारा VIDEO

एक सिंहीण अचानक दुचाकीसमोर येते. तिला पाहताच दुचाकीस्वाराचा श्वास रोखला गेला. साक्षात मृत्यू समोर आल्यासारखी ही घटना आहे, पण झालं काही वेगळंच. पाहा गुजरातच्या एका खेड्यातील हा VIDEO

मुंबई, 20 फेब्रुवारी: सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. सिंहाची नुसती गर्जना ऐकू आली, तरी अंगाचा थरकाप उडतो. तुम्ही कधी विचार केला का, तुमच्या समोर अचानक सिंह आला तर तुमचं काय होईल. हा विचार करताच अंगावर काटा येतो. असं झालं तर सिंहाच्या तावडीतून वाचणं तसं कठीण आहे. सध्या असाच एक थरारक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. एक सिंहीण अचानक दुचाकीसमोर येते. तिला पाहताच दुचाकीस्वाराचा श्वास रोखला गेला; पण सिंहिणीने दुचाकीस्वाराकडे चक्क दुर्लक्ष केलं आणि ती रस्त्यातून निघून गेली. भारतीय वन सेवा अधिकारी सुसंता नंदा यांनी (Indian Forest Service Officer) ट्विटरवर (Social Media) हा व्हिडीओ (Wildlife Amazing Video) शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला गावातल्या कच्च्या रस्त्यावर एक सिंहीण उभी दिसते. ही सिंहीण दिसताच दुचाकीस्वार आपली गाडी थांवबतो आणि तिथेच शांतपणे उभा राहतो. दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या महिलेने व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. हे वाचा-विंचू आणि विषारी सापांपासून बनवली जाते ही डिश; रेसिपी पाहूनच उडेल थरकाप, VIDEO दुचाकीला पाहताच सिंहिणीने त्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली; पण पुढे येऊन तिने आपला मार्ग बदलला आणि दुसऱ्या बाजूला निघून गेली. व्हॅलेंटाइन डेला सुसंता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला नेटकऱ्यांनी तुफान पसंती दिली आहे. गावातल्या रस्त्यावरच्या एका प्रवाशाच्या बाबतीत ही घटना घडली असून, हे फक्त भारतामध्ये होऊ शकतं, असं कॅप्शनमध्ये नंदा यांनी लिहिलं आहे. 21 सेकंदांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. संबंधित व्हिडीओ कुठला आहे, असं एकाने विचारलं. त्यावर हा व्हिडीओ गुजरातमधल्या एका गावातला असल्याचं नंदा यांनी सांगितलं. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून सर्व जण आश्चर्यचकित झाले आहेत. सुसंता नंदा आपल्या ट्विटर अकाउंटवरून असे सुंदर व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. अनेक जण सुसंता नंदा यांच्या व्हिडीओची वाट पाहत असतात. त्यांचं संपूर्ण ट्विटर अकाउंट वन्यप्रेमींच्या अशाच रोमांचक व्हिडीओंनी भरलेलं आहे. सोशल मिडीयावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये प्राण्यांच्या व्हिडीओजची संख्या तशी जास्त असते.
First published:

Tags: Live video viral, Viral videos

पुढील बातम्या