नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : आजकाल फॅशनच्या नावाखाली कोण काय करेल, याचा काही भरवसा राहिला नाही. कॉलेज तरुणाईमध्ये तर फॅशनची खूप क्रेझ असते. कॉलेजमध्ये गेल्यानंतर स्वतःकडे इतरांच लक्ष वेधून घेण्यासाठी तरुणाईचा हटके फॅशन करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका विचित्र फॅशनबद्दल सांगणार आहोत. फॅशनच्या नावाखाली एका व्यक्तीनं पायामध्ये असे बूट घातले की, जे पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. ‘एनडीटीव्ही इंडिया’ने याबाबत वृत्त दिलंय.
काळाबरोबर फॅशन करण्याची पद्धतसुद्धा झपाट्यानं बदलत आहे. एखाद्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल, अशा गोष्टीही आता फॅशनच्या नावाखाली करण्यात येऊ लागल्यात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका विचित्र फॅशनचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही चकित व्हाल. हा व्हिडिओ एका व्यक्तीनं पायात घातलेल्या बुटाचा आहे. या व्यक्तीच्या बुटाचा आकार हा फणा काढलेल्या नागासारखा आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही थोडी भीती वाटेल आणि दरदरून घाम फुटेल.
fashion anyone??? pic.twitter.com/IfzXx1EWZo
— ViralPosts (@ViralPosts5) February 7, 2023
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये तुम्ही एका व्यक्तीनं पायात घातलेली बुटाची जोडी पाहू शकता. हा बूट पाहिल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम वाटेल की, बुटामधून नाग बाहेर येत आहे. पण प्रत्यक्षात या बुटाचा आकारच फणा काढलेल्या नागाप्रमाणे आहे. हा व्हिडिओ 29 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्यावर भरभरून कमेंट आल्यात. विचित्र दिसणारे हे बूट पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पहिल्यांदाच व्हिडिओ पाहिल्यानंतर किती घाबरलो होतो, अशा स्वरुपाच्या कमेंट व्हिडिओवर अनेकांनी दिल्यात. तर, काहींच्या मते हे बूट जास्त फॅशनेबल नाहीत. सध्या मात्र या बुटाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अशा प्रकारचा अनोखा बूट घालण्याची फॅशन इतराचं स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रभावी ठरली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर आजकाल विविध फॅशनचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याही अनेकदा आश्चर्य वाटतं. अशा हटके फॅशनच्या व्हिडिओला सोशल मीडिया युजर्सचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो. फॅशनसंबंधी व्हिडिओ शेअर करणं, लाईक करणं, त्यावर कमेंट करण्यास अनेकजण प्राधान्य देतात. त्यामुळे आजकाल सोशल मीडियावर वेगवेगळे फॅशनसंबंधी व्हिडिओ पोस्ट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यातही थोडी हटके फॅशन असेल, तर त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय. फणा काढलेल्या नागाच्या आकारातील बूट पाहिल्यानंतर तुम्हालाही याची खात्री पटेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Shocking video viral, Social media viral, Top trending, Videos viral, Viral