मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Love Story चा धक्कादायक अंत, ३ वर्षानंतर बायको नवऱ्याला भेटताच झाला मृत्यू

Love Story चा धक्कादायक अंत, ३ वर्षानंतर बायको नवऱ्याला भेटताच झाला मृत्यू

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या महिलेसोबत असं नक्की काय घडलं? हे जाणून घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा होती. जेव्हा लोकांना कारण कळलं तेव्हा लोकांना देखील धक्का बसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई २६ नोव्हेंबर : जगभरातून अनेक प्रेमकथा आणि नातेसंबंधांची प्रकरणं तुम्ही एकलं असेल. जे ऐकून कधी फार मस्त वाटतं तर काही कथा आपल्याला विचार करायला भाग पाडतात. नुकतीच अशीच एक घटना समोर आली होती, ज्यात एक महिला तब्बल तीन वर्षानंतर आपल्या पतीला भेटली मात्र दोघांची भेट होताच असं काही घडलं की काही क्षणातच महिलेचा मृत्यू झाला.

हे प्रकरण सोशल मीडियावर भलतंच चर्चेत आलं. या महिलेसोबत असं नक्की काय घडलं? हे जाणून घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा होती. जेव्हा लोकांना कारण कळलं तेव्हा लोकांना देखील धक्का बसला, नियतीला कधी काय मान्य असेल हे कोणीच सांगू शकत नाही....

हे ही वाचा : Viral : शेतकऱ्याची बायको गुपचूप करायची अडल्ट मॉडलिंग करते, नवऱ्याला कळलं तेव्हा...

नक्की असं काय घडलं?

वास्तविक, हे संपूर्ण प्रकरण रशियात राहणाऱ्या एका महिलेशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निक नावाच्या 30 वर्षीय महिलेची लव्हस्टोरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चीनच्या एका पुरुषासोबत सुरू झाली आणि 2018 मध्ये ते दोघंही पहिल्यांदा चीनमध्ये भेटले होते. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचे लग्न देखील झाले.

या दोघांच्याही लग्नात मित्रपरिवार होता आणि दोघेही खूप आनंदात होते. दरम्यान, ही महिला लग्न झाल्यानंतर चीनहून रशियाला आपल्या घरी पुन्हा परतली होती, ती काही काळासाठीच आपल्या घरी गेली होती. ज्यानंतर ती चीनला पुन्हा कायमची राहायला येणार होती.

मात्र या काळात जगभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. मग अशी परिस्थिती उद्भवली की, ही जोडपी तीन वर्षे एकमेकांना भेटू शकली नाहीत. अखेर जेव्हा सगळं काही ठिक होऊ लागलं तेव्हा ही महिला चीनला आपल्या नवऱ्याकडे गेली.

पण यावेळी सुद्धा नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. ही महिला जेव्हा चीनमध्ये पोहोचली तेव्हा थोड्याच वेळात हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला.

या महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असताना तिच्या नवऱ्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. या घटनेनंतर नवऱ्याने आपल्या बायकोच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे त्याची बायको या जगात जिवंत आहे असं त्याला सतत जाणवेल. लोकांनी या नवऱ्याचं कौतुक केलं आहे. तसेच या जोडप्यासाठी लोकांना वाईट देखील वाटत आहे.

First published:

Tags: Relationship, Shocking, Shocking news, Social media, Viral