मराठी बातम्या /बातम्या /Viral /आधी शर्ट काढला नंतर केली प्रवाशासोबत मारहाण, विमानात नक्की काय घडलं? पाहा Video

आधी शर्ट काढला नंतर केली प्रवाशासोबत मारहाण, विमानात नक्की काय घडलं? पाहा Video

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

गेल्या काही काळापासून विमानात किंवा एअरपोर्टवर अनेक धक्कादायक घटना घडत असल्याचं समोर येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 11 जानेवारी : गेल्या काही काळापासून विमानात किंवा एअरपोर्टवर अनेक धक्कादायक घटना घडत असल्याचं समोर येत आहे. सामान गहाळ होणे, मारामारी, भांडणं, तर कोणी विमानात लघुशंका करताना दिसतं, असे अनेक प्रकार विमानात घडत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवासीही विमानाने प्रवास करण्यासाठी घाबरत आहेत. अशातच विमानातील प्रवाशासोबत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पुन्हा एकदा विमानात गैरप्रकार घडल्याचं समोर आलं आहे. विमानात घडलेल्या या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिमन बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानात एका शर्टलेस प्रवाशाची दुसर्‍या व्यक्तीशी बाचाबाची झाली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद समोर आला. एअरलाईन क्रू म्हणून काम करणाऱ्या बितांको बिस्वास नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीमुळे पुन्हा एकदा विमानातील धक्कादायक प्रकार काही थांबत नसल्याचं दिसून आलं आहे.

हेही वाचा -  हटके स्टाईलने चहा भरणं विक्रेत्याला पडलं महागात, प्लॅस्टिकची पिशवी फुटली अन्...

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक विना शर्टचा व्यक्ती विमानातील दुसऱ्या प्रवाशाची हाणामारी करत आहे. विना शर्टचा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठोसे मारताना दिसत आहे आणि तो व्यक्तीही शर्ट न घातलेल्या व्यक्तीला मुस्काडीच मारत आहे. विमानातील इतर प्रवासी आणि क्रू मेंबर हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या भांडणाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

व्हिडिओ शेअर करताना बितांको बिस्वास यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'आणखी एक अनियंत्रित प्रवासी. यावेळी विमान बांगलादेशच्या बोईंग 777 फ्लाइटमध्ये!' व्हिडिओ शेअर करतानाच तो झपाट्याने व्हायरल झाला आणि आतापर्यंत अधिक वेळा व्हिडीओ पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी आपलं मत मांडलं. एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, "फ्लाइटमध्ये अल्कोहोल देणे बंद करा, जर असे वारंवार होत असेल तर." दुसर्‍या नेटिझनने लिहिले, "फ्लाइट दरम्यान खूप वाईट घटना. यामुळे विमान कंपन्यांचे नावही खराब होते. कठोर कारवाई झाली पाहिजे.'

दरम्यान, विमानात भांडणं, हाणामारी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापहिलेही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. असे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

First published:

Tags: Airplane, Airport, Top trending, Video viral, Viral news