मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking Video : कोल्ह्याला गिळताना 12 फूट लांब आणि 40 किलो वजनाच्या Python ची अशी अवस्था

Shocking Video : कोल्ह्याला गिळताना 12 फूट लांब आणि 40 किलो वजनाच्या Python ची अशी अवस्था

कोल्ह्याला गिळणं शक्य होत नसल्याने तो शेतात निपचित पडून होता. गावकरी शेतात आल्यानंतर त्यांना हे चित्र पाहून धक्काच बसला.

  • Published by:  Meenal Gangurde

मध्य प्रदेश, 3 सप्टेंबर : सागर येथील निमोन पडगाव गावात एका 12 फुटी लांब आणि 40 किलो वजनाच्या अजगराने ( Python ) नाल्याच्या किनाऱ्यावर पाणी पिणाऱ्या कोल्ह्यावर हल्ला केला. त्याने हल्ला केल्यानंतर कोल्ह्याला गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र अजगराला काही कोल्ह्याला गिळता येईना. यानंतर बराच काळ अजगर नाल्याच्या किनाऱ्यावर अस्वस्थ पणे पडून असल्याचं गावकऱ्यांना दिसलं. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल (Shocking Viral Video) झाला आहे.

यानंतर गावकऱ्यांनी तातडीने कारवाई करीत अजगराला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. कोल्हा आकाराने मोठा असल्या कारणाने अजगराला गिळता येत नव्हतं. तसं कोल्ह्याचा मृत्यू झाला होता. गावकरी जेव्हा शेतात गेले तेव्हा नाल्याच्या किनाऱ्यावर त्यांना भलामोठा अजगर दिलला. अजगराने कोल्ह्याला तोंडात दाबून ठेवलं होतं. वन विभागाला तातडीने याची सूचना देण्यात आली. (Shocking Video Python 12 feet long and weighs 40 kg while swallowing a fox)

हे ही वाचा-VIDEO - म्हशीवर हल्ला केल्याने चवताळला रेडा; चक्क सिंहांनाही शिंगावर धरून आपटलं

" isDesktop="true" id="600304" >

वन विभागाची टीम सागरमध्ये स्नॅक कॅचर अकील बाबा आणि असद यांना घेऊन पोहोचली. येथे दोघांनी तब्बल अर्धा तास प्रयत्न करीत अजगराच्या तोंडून कोल्ह्याला बाहेर काढलं. अजगराला पकडल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

First published:

Tags: Python, Shocking video viral, Video viral