मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: भरधाव ट्रेनची ट्रकला जोरदार धडक; थराकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

VIDEO: भरधाव ट्रेनची ट्रकला जोरदार धडक; थराकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

सोशल मीडियावर तुम्ही रेल्वे अपघाताचे अनेक भयानक व्हिडिओ (Shocking Video Viral on Social Media) पाहिले असतील. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 31 ऑगस्ट : रेल्वेचा प्रवास खरंतर सगळ्यात सुंदर असतो, असं म्हटलं जातं. मात्र, काहीवेळा असे रेल्वे अपघात (Train Accident) घडतात ज्यांच्याबद्दल ऐकूनही थरकाप उडतो. सोशल मीडियावर तुम्ही रेल्वे अपघाताचे अनेक भयानक व्हिडिओ (Shocking Video Viral on Social Media) पाहिले असतील. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेच्या टेक्सासमधील शहर सँट एंटोनियो येथील आहे. यात एक ट्रेननं ट्रकला धडक दिल्याचं पाहायला मिळतं.

एका रिपोर्टनुसार, ही घटना रविवारी दुपारी घडली. हायवे 183 वर बनलेल्या रेल्वे ट्रॅकवर ही ट्रक थांबलेली होती. इतक्यात मागून एक ट्रेन आली. यानंतर ट्रेन थेट ट्रकला जाऊन धडकली. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा ट्रेन अतिशय वेगात होती. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की कशाप्रकारे ट्रेन वेगात आलेली आहे आणि ट्रकचे मागच्या बाजूला धडक मारते.

VIDEO: आधी शांततेत बोलले मग अचानक रस्त्यावरच सुरू झाली वृद्धांची तुफान हाणामारी

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं, की ट्रकच्या मागील भागात विंड टरबाईन ब्लेड ठेवले गेले होते. ट्रेन याच भागाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरात होतीस की ट्रक पलटी झाला. मात्र, सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. सोशल मीडियावरही या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी म्हटलं की खरंच रेल्वे अपघात अतिशय भयंकर असतात. त्यामुळे ट्रेनपासून सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे.

नवरदेवानं मेहुणीसोबत केलं असं काही की पाहुणेही बघत राहिले, लग्नातील Video Viral

ट्विटरवर हा व्हिडिओ PermianLandman नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी देईपर्यंत 3 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, 84 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. 26 हजारहून अधिकांनी व्हिडिओ रिट्विटही केला आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Viral video on social media