• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ..अन् भल्यामोठ्या अजगरानं अख्खं मांजर गिळलं; पाहा मन सुन्न करणारा VIDEO

..अन् भल्यामोठ्या अजगरानं अख्खं मांजर गिळलं; पाहा मन सुन्न करणारा VIDEO

एका अजगरानं मांजराला पकडलं आहे. या भल्यामोठ्या अजगराच्या तावडीत सापडलेलं मांजर स्वतःची सुटका करण्यासाठीचे प्रयत्न करूनही अपयशी ठरलं आहे आणि साप हळूहळू त्याला गिळून घेत आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 29 जुलै : शिकारी प्राणी नेहमीच आपल्या शिकारीच्या शोधात असतात आणि संधी मिळताच ते झडप घालतात. हे प्राणी शिकारीसाठी चपळपणा आणि हुशारी या दोन्हीचा वापर करतात. विशेषतः सिंह, चित्ता अशा प्राण्यांच्या शिकारीचा अंदाज तर पाहण्यासारखा असतो. सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडिओ (Viral Video) शेअर केले जातात, ज्यात प्राणी शिकार करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक अजगर (Python Video) मांजरीची शिकार करताना पाहायला मिळतं. विहीर खोदताना नशीब बदललं, हाती लागला 'नीलम', किंमत पाहून थक्क व्हाल! वाइल्डलाइफमध्ये रस असणारे लोकं आपला बराच वेळ हा जंगलांमध्ये फिरण्यात घालवतात. जेणेकरून त्यांना चांगले फोटो आणि व्हिडिओ मिळतील. अशाच एका खास व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एका अजगरानं मांजराला पकडलं आहे. या भल्यामोठ्या अजगराच्या तावडीत सापडलेलं मांजर स्वतःची सुटका करण्यासाठीचे प्रयत्न करूनही अपयशी ठरलं आहे आणि साप हळूहळू त्याला गिळून घेत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील पीलीभीत टायगर रिजर्व येथील आहे. अजगरानं ज्या पद्धतीनं मांजराची शिकार केली आहे, ती पाहून सगळेच हैराण झाले आहेत. काळजाचा ठोका चुकवेल हा VIDEO! दूधसागर रोरावत ट्रेनवर कोसळला, निम्मी ट्रेन गायब हा हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. लोकं हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण झाला असाल. अनेकांचं असं म्हणणं आहे, की त्यांनी पहिल्यांदाच अजगराला अशाप्रकारे मांजर खाताना पाहिलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: