Home /News /viral /

विमानतळावर बसलेल्या प्रवाशाने महिलेसमोरच केली लघुशंका, किळसवाणा VIDEO समोर

विमानतळावर बसलेल्या प्रवाशाने महिलेसमोरच केली लघुशंका, किळसवाणा VIDEO समोर

हा किळसवाणा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी उलटसुलट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

    मुंबई, 4 जानेवारी : विमानतळावरील एक व्हिडिओ सध्या वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक प्रवाशी लघुशंका करताना दिसत आहे. त्यावेळी आजुबाजूला महिलांसह इतरही प्रवाशी बसलेले दिसत आहे. हा किळसवाणा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी उलटसुलट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. विमानळावरील हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील 'पॅसेंजर शेमिंग' या प्रसिद्ध पेजने शेअर केला आहे. हे इन्स्टाग्राम पेज सातत्याने प्रवाशांनी केलेल्या धक्कादायक कृत्याचे व्हिडिओ शेअर करत असतं. हा व्हिडिओ शेअर करताना तो नेमका कुठल्या विमानातळवरील आहे आणि कधीचा आहे, याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.
    हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी संबंधित व्यक्तीविरोधात राग व्यक्त केला आहे. तसंच सर्वांसमोर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक कऱण्यात आली असावी, असा अंदाजही व्यक्त केला आहे. तर काही यूजर्सने मात्र त्या व्यक्तीला मूत्राशयाचा त्रास असल्याने त्याने असं कृत्य केलेलं असू शकतं, असा अंदाज बांधला आहे. सोशल मीडिया यूजर्सच्या काही प्रतिक्रिया:
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या