मराठी बातम्या /बातम्या /Viral /

डोक्यावर विग अन् कानात हेडफोन घालून देत होता पोलीस भरती परीक्षा; कारनामा पाहून व्हाल थक्क, VIDEO

डोक्यावर विग अन् कानात हेडफोन घालून देत होता पोलीस भरती परीक्षा; कारनामा पाहून व्हाल थक्क, VIDEO

Cheating in Exam: व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती कॉपी करताना पकडला गेला. त्याने आपल्या डोक्याच्या केसांवरती एक विग लावलेलं होतं

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 डिसेंबर : सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी आजही लोक निरनिराळे जुगाड करण्याच्या प्रयत्नात असतात. परीक्षेत पास होण्यासाठी हुशार विद्यार्थी भरपूर अभ्यास करतात, तर जे विद्यार्थी डोक्याने फार हुशार नसतात ते खूप डोकं वापरून कॉपी (Cheating in Exam) करतात. अनेकदा काही विद्यार्थी कॉपी करण्यात यशस्वी होतात तर अनेकदा पकडलेही जातात. सध्या कॉपी करताना पकडल्या गेलेल्या अशाच एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Cheating Video Viral) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच मुन्नाभाईची आठवण होईल.

काहीही! खरंच असं कुणी फिट राहतं का? मॉडलचं फिटनेस सिक्रेट वाचूनच हैराण व्हाल

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती कॉपी करताना पकडला गेला. त्याने आपल्या डोक्याच्या केसांवरती एक विग लावलेलं होतं. या विगच्या आतून एअरफोन कनेक्ट केले होते. या एअरफोनच्या माध्यमातून हा तरुण दूर कुठेतरी बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीला प्रश्नांची उत्तरं विचारू शकत होता. कॉपी करण्याची ही पद्धत पाहून एग्झामिनरही हैराण झाले.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, #UttarPradesh मध्ये Sub-Inspector च्या परीक्षेत कॉपीचे अजब जुगाड. हा जुगाड पाहून यूजर्सही हैराण झाले असून यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

जन्मताच 24 तास खतरनाक सापांशी संघर्ष; जंगलात भयंकर अवस्थेत सापडली नवजात चिमुकली

एका यूजरने लिहिलं, इतका भयंकर जुगाड करण्यासाठी वेळ मिळाला पण अभ्यासाठी नाही. हाच जुगाड प्रायव्हेट कंपनीमध्ये दाखवला असता तर चांगली सॅलरी मिळाली असती. लोकांना सरकारी नोकरीच पाहिजे. हेच डोक्यात बसलं आहे. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, कोणी कल्पनाही करू शकत नाही की अशाप्रकारे कॉपी केली जाऊ शकते. हा व्यक्ती उत्तर प्रदेश पोलिसाच्या सब इन्सपेक्टरच्या परीक्षेत ही कॉपी (Cheating in Uttar Pradesh Sub Inspector Exam) करत होता.

First published:

Tags: Police, Shocking video viral