नवी दिल्ली 13 जुलै: ऐन लग्नमंडपातच नवरीनं (Bride) लग्नातील कार्यक्रमांना नकार दिला तर सहाजिकच उपस्थित सर्वांच्या मनात अनेक सवाल उपस्थित होतात. काहींना असं वाटतं, की मुलीला नवरदेवा (Groom) आवडलेला नाही. काहींना वाटतं, की हे लग्न जबरदस्ती केलं जात आहे. तर, काही असा विचार करतात की नवरीला दुसरं कोणीतरी आवडत असेल. यातलं कोणतं कारण खरं आहे, हे फक्त नवरीला आणि तिच्या घरच्यांनाच माहिती असतं. सध्या एका अशाच घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Wedding Video) झाला आहे.
दीपिकाच्या गाण्यावर आजीबाईंचा धम्माल डान्स VIDEO; उत्साह पाहून व्हाल थक्क
सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी मंडपात नवरदेवासोबत बसलेली आहे. मंडपात बसलेला नवरदेव नवरीला कुंकू लावण्यासाठी हात पुढे करतो इतक्यात ती त्याचा हात बाजूला सारते. नवरीबाई एकदम तयार होऊन नवरदेवाच्या बाजूला बसली आहे. मात्र, लग्नाला ती नकार देत आहे. नवरीच्या कुटुंबातील एक महिला असं केल्यामुळे तिच्यावर ओरडते, मात्र पुन्हा असंच होतं. हा व्हिडिओ (Shocking Video Viral) पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.
VIDEO: महिलेला वाचण्यासाठी युवकाची समुद्रात उडी; गेट वे ऑफ इंडियाजवळचा प्रकार
नवरीचा राग सरसरळ तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. मात्र, नवरी का नाराज आहे, हे समजू शकलेलं नाही. काही सेकंदांचा हा व्हिडिओ फेसबुकवर चांगलाच व्हायरल झाला आहे. तीन लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर, एक कोटीहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Shocking video viral