Elec-widget

VIDEO : धक्कादायक! शाळेत अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करताना मुलगी दुसऱ्या मजल्यावरून पडली

VIDEO : धक्कादायक! शाळेत अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करताना मुलगी दुसऱ्या मजल्यावरून पडली

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका खाजगी शाळेत धक्कादायक घटना घडली. एक विद्यार्थिनी अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली...

  • Share this:

राघवेंद्र साहू

रायपूर, 13 नोव्हेंबर : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका खाजगी शाळेत धक्कादायक घटना घडली. एक विद्यार्थिनी अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली. ही मुलगी यामध्ये गंभीर जखमी झालीय. आता पोलीस या घटनेचा तपास करतायत. जिल्हा शिक्षण विभागाने या शाळेच्या व्यवस्थापनाला याबद्दल नोटीस पाठवली आहे.

रायपूरच्या डुमरतराईमधल्या द रेडियंट वे स्कूलमध्ये 12 नोव्हेंबरच्या दुपारी ही घटना घडली. शाळेत अ‍ॅडव्हेंचर कॅम्पमध्ये साहसी कवायती चालल्या होत्या. त्यावेळी जिप रो ला लटकून कार्तिषा उंचावरून खाली पडली. हा मुलगी चौथीच्या वर्गात आहे. आता तिच्यावर रायपूर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलाय.

FIR दाखल

रेडियंट वे स्कूलचे संचालक आणि मुख्याध्यापकांच्या विरोधात पोलिसांनी FIR दाखल केला आहे. त्याबरोबरच शाळेची मान्यता रद्द करण्याची नोटीस व्यवस्थापनाला पाठवली आहे.

ही मुलगी उंचावरून खाली पडल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापकांनी डॉक्टरांना बोलवलं नाही, अशी माहिती आहे. हे लोक या मुलीच्या नातेवाईकांची वाट बघत राहिले, असाही आरोप आहे. या शाळेत सुमारे 1800 विद्यार्थी आहेत. या अ‍ॅडव्हेंचर कॅम्पमध्ये 400 विद्यार्थी सहभागी झाले होते.

=======================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 03:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...