मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking Video : मेट्रोच्या खाली 68 वर्षीय महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; CISF कर्मचाऱ्यांमुळे थोडक्यात वाचला जीव

Shocking Video : मेट्रोच्या खाली 68 वर्षीय महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; CISF कर्मचाऱ्यांमुळे थोडक्यात वाचला जीव

महिला आत्महत्येच्या तयारी होती, तेवढ्यात...

महिला आत्महत्येच्या तयारी होती, तेवढ्यात...

महिला आत्महत्येच्या तयारी होती, तेवढ्यात...

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांना विविध पातळींवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना हा त्रास सहन न झाल्याने आत्महत्येसारख्या पर्यायांचा स्वीकार केल्याचंही दिसून येत आहे. मात्र आत्महत्या (Suicide Cases In India) हा कधीच कोणत्याही अडचणीवरील उत्तर नाही, त्यामुळे मानसिक त्रासात असणाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकाने करणे हे त्याचं कर्तव्य आहे.

एका 68 वर्षीय महिला आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना हरयाणातील (Haryana News) असल्याचं सांगितलं जात आहे. 65 वर्षांच्या वृद्ध महिलेने ब्लू लाइनच्या मयूर विहार एक्सटेन्शन मेट्रो स्टेशनवर आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide at metro station) केला. यावेळी मेट्रो स्टेशनवर तैनात CISF कर्मचाऱ्यांनी ( CISF staff ) एका वृद्ध महिलेला आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात मेट्रो लाइनच्या खालून जाताना पाहिलं.

हे ही वाचा-VIDEO :शाळेच्या खोलीत तरुणीसोबत शिक्षकाचा घृणास्पद प्रकार, गावकऱ्यांनी पकडलं

स्टेशन नियंत्रणच्या माध्यमातून तत्काळ ट्रेन संचालकांना याबाबत सूचना देण्यात आली. मेट्रो ऑपरेटरने वेळेत आपात्कालीन ब्रेकचा वापर करीत मेट्रो थांबवली. यानंतर CISF च्या कर्मचाऱ्यांनी महिलेले ट्रेनच्या खालून बाहेर काढलं. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.(Shocking Video Attempted suicide of 68 year old woman under metro CISF staff survived)

" isDesktop="true" id="615199" >

मेट्रो व्यवस्थापनाने प्रसंगावधान राखल्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे. या महिलेच्या कुटुंबाबाबत चौकशी केली जात असल्याचं वृत्त समोर आलं आहे. गेल्या काही महिन्यात आत्महत्येचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. अनेकांनी तर सोशल मीडियावरदेखील आत्महत्येचा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि समाजाचा विचार करता हे चिंता वाढवणारं आहे.

First published:

Tags: Delhi, Shocking viral video, Suicide attempt